August 9, 2025

६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आखाडा पूजन उत्साहात

  • धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद,उस्मानाबाद जिल्हा तालिम संघ व आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ,धाराशिव यांच्या संयुक्त वतीने आयोजित ६५ वी वरिष्ठ गट गादी व माती राज्य अजिंक्य पद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी किताब लढतीचे धाराशिव येथील श्री.तुळजाभवानी भवानी क्रीडा संकुल येथे दि.१६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओम्बासे , आदर्श शिक्षक प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर अण्णा पाटील,जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते आखाडा पूजन करण्यात आले.यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.के चव्हाण,तहसीलदार शिवानंद बिडवे, नायब तहसीलदार संतोष नलावडे, अर्जुन पुरस्कारार्थी काका पवार,खो खो फेडरेशनचे उपाध्यक्ष डॉ.चंद्रजीत, जिल्हा तालीम संघटनेचे सचिव वामन गाते यांची प्रमुख उपस्थिती होती.
    याप्रसंगी कुस्ती प्रेमींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
error: Content is protected !!