कळंब (माधवसिंग राजपूत )- कळंब येथे प्रतिवर्षाप्रमाणे भगवंत विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे भगवंत जयंती प्रकट दिन निमित्त नामसंकीर्तन महोत्सव सोहळा प्रारंभ ७ मे २०२५ ते सांगता १० मे २०२५ आयोजित करण्यात आला आहे या सोहळा उद्घाटन प्रसंगी हेमंत ढोकले तहसीलदार, कळंब राजेशजी तापडिया नायब तहसीलदार कळंब, बाळकृष्ण गुरसाळे, गोकुळ भराडिया, नायब तहसीलदार कळंब, सुरेशराव कल्याणकर, जयवंतराव कुलकर्णी,श्रीकांत जोशी कळंबकर यांची उपस्थिती असणार आहेत.या जयंती उत्सवात किर्तन सेवा ह.भ.प.दत्ता महाराज आंबीरकर, ह.भ.प.बाळासाहेब महाराज बोधले,ह.भ.प.प्रसाद महाराज सहस्रबुद्धे व काल्याची किर्तन सेवा श्रीधर बुवा रामदासी यांची आहे काल्याचा महाप्रसाद गिरीश माने यांच्यावतीने होणार आहे.यानिमित्त दैनंदिन कार्यक्रम पहाटे ६ ते ७ काकडा आरती ७ ते ७-३० विष्णु सहस्त्रनाम, ७-३० ते ९ ज्ञानेश्वरी पारायण,११ ते १ भोजन व विश्रांती,१ ते ५ सामुदायीक भजन,५ ते ६ हरिपाठ,७ ते ९ हरीकिर्तन, रात्रौ भोजन श्री ज्ञानेश्वरी पारायण प्रमुख- श्री ह.भ.प. जयवंतराव कुलकर्णी,हरिपाठ नेतृत्व : ह.भ.प. काका चोंदे, पांडुरंग माळवदे, सौ. नंदाताई पांचाळ, परिमळबाई घुले,महापूजा : दि. ७/५/२५ रोजी पहाटे ६ वा. श्री सुनिलराव वेदपाठक यांचे हस्ते होईल.महापूजा : दि. ९/५/२५ रोजी पहाटे ४ ते ५ श्री महेशअप्पा मुंडे,श्री किशोर मुंडे यांचे हस्ते व श्री भगवंत जयंती निमित्त श्री प्रसाद महाराज सहस्रबुद्धे यांचा कीर्तनाचा कार्यक्रम पहाटे ५ ते ७ या वेळेत होईल कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रकाशराव मोरे, विलासराव मिटकरी, किशोर बियाणी, नागनाथ शेंडगे, बब्रुवान कोळपे, अनंतराव देशमुख, श्रीकांत महामुनी , शाहूराव कुलकर्णी, संजय मुंडे, वसंतराव बारटक्के,विजयसिंह मोहिते,चंद्रशेखर बारटक्के, ज्ञानेश्वर बारटक्के, हे परिश्रम घेत आहेत, भगवंत जयंती उत्सव कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन पुजारी जीवनराव रत्नपारखी व भाग्येश रत्नपारखी यांनी केले आहे.
More Stories
छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणावर बुलडोझर;नगरपालिकेची धडक मोहीम सुरू
रॉकेल वाटपाचा मोठा निर्णय; आता एका रेशन कार्डवर ३ लिटरच मिळणार!
“मोठ्या महादेवाचा मार्ग धोक्यात!” — पुरात वाहून गेला रस्ता-पूल; चैत्र एकादशीपूर्वी दुरुस्तीची शिवभक्तांची आर्त मागणी