August 9, 2025

स्वराज्य फाऊंडेशनच्या वतीने निखील पाटील यांचा सत्कार

  • शिराढोण (परमेश्वर खडबडे यांजकडून ) – कळंब तालुक्यातील शिराढोण या गावातून पहीला क्लास वन अधिकारी झालेला निखील आरून पाटील यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
    निखील पाटील यांनी प्रेरणादायी शैक्षणिक प्रवास केला. त्यांचे शिक्षण शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय उदगीर येथे आणी पशुवैद्यकीय रीसर्च सेंटर आकोला येथे पूर्ण झाले तर 2020 मध्ये झालेल्या लोकसेवा आयोगाच्या एम पी एस सी परीक्षेत उत्कृष्ट गूणांकाने ऊतीर्ण होऊन महाराष्ट्र राज्य पशुधन विकास अधिकारी एल डी ओ क्लास वन अधिकारी म्हणून निवड झाल्या बद्दल शिराढोण गावात आनंदोत्सव साजरा केला. नव्या पीढीतील पहीला क्लास वन अधिकारी म्हणून सगळेजण कौतूक करत आहेत. त्यांच्या वडीलांच्या निधनानंतर आई आणी मोठे बंधू यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य प्रकारे शिक्षण घेत लक्ष प्राप्ती केली. या प्रसंगी मनोगत व्यक्त करत असताना त्यांनी आई आणी मोठ्या भावाचे ऋण व्यक्त केले. शिवाय पशुवैद्यकीय क्षेत्र हे खूप उद्योग व्यावसाय आणी नौकरीच्या संधी उपलब्ध करूण देणारे क्षेत्र आहे. याकडे सकारात्मक दृष्टीकोनातुन बघावे आणी विविध संधींचा लाभ घ्यावा. त्या प्रत्येक संधीची सविस्तर माहिती देऊन पशुधनाचे संगोपन कसे करावे याचे मार्गदर्शन केले.
    निखील पाटील सारखे हरहुन्नरी विद्वान तरूण अधिकारी म्हणून लाभल्यास त्या भागाचा नक्कीच विकास होईल आसा आत्मविश्वास शेतकऱ्यांना जाणवत होता.
    या प्रसंगी शाम काका पाटील,पद्माकर पाटील,अमोल माकोडे ,नामदेव माकोडे,सचीन पाटील,कुलदीप पाटील,राजेश पाटील, ॲड.नीतीन पाटील,वैभव पाटील,परमेश्वर पाटील, संतोष पाटील,राकेश पाटील, ऋषी पाटील, दिनकर नाना पाटील, रावसाहेब आबा पाटील. इत्यादी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
error: Content is protected !!