August 9, 2025

बाबूराव जाधव यांचे निधन

  • कळंब – तालुक्यातील ईटकूर येथील शेकापचे ज्येष्ठ नेते तथा गुरुकृपा शैक्षणिक संस्था पिंपळगाव(डो)संचलित कै.नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालय भाटशिरपुराचे अध्यक्ष भाई बाबूराव जाधव (वय ७६) यांचे दि.१२ नोव्हेंबर २०२३ रोजी वार रविवारी निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर ईटकूर येथील शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासूनच समाजकारणात अन् तेथून राजकारणात रमलेल्या या भाईंनी अवघं आयुष्य शेतकरी कामगार पक्षात खर्ची घातलं. भाईंना अखेरच्या श्वासापर्यंत लाल बावट्याला सोडले नाही. अशा पक्ष आणि तत्त्वनिष्ठा न सोडणाऱ्या या चळवळीतील नेतृत्वास सोमवारी अखेरचा लाल सलाम देण्यात आला.
error: Content is protected !!