कळंब – तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळकरंजा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याबाबत वृत्त असे की,जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा माळकरंजा येथे विश्वरत्न, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134 व्या जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.यावेळी गावातील ग्रामस्थ तसेच गावचे प्रथम नागरिक तथा सरपंच विजयराव शिंदे उपसरपंच तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद गालट यांच्यासह गावकरी उपस्थित होते.यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर माहिती दिली. शाळेतील उपक्रमाशील शिक्षक हनुमंत घाडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवन परिचय उपस्थित विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना करून दिला.शालेय समितीचे अध्यक्ष शरद गालट यांनीही विद्यार्थ्यांना संबोधित करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे केवळ एका जातीपुरते मर्यादित नव्हते तर ते अखिल विश्वासाठी लाभदायक आणि प्रगतिशील होते याबाबत मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक संतोष भोजने यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की,डॉ.बाबासाहेब आंबेडकर हा एक विचार आहे.जगातील सर्वच देशांमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्राचा अभ्यास केला जातो.डॉक्टरेट मिळविल्या जातात.सर्वच देश आपल्या संविधानाचा सन्मान करतात. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती ही नाचून साजरी न करता पुस्तक वाचून साजरी करावी असे आवाहन त्यांनी केले. यावेळी शाळेतील युवा प्रशिक्षणार्थी कुमारी मंजुश्री नारायण कराड,सहशिक्षिका श्रीमती भारती सूर्यवंशी यांच्यासह सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन