August 8, 2025

विद्याभवनच्या दर्शनने घातली सुवर्णपदकाला गवसणी

  • कळंब ( विशाल पवार ) – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंबचा गुणवंत विद्यार्थी दर्शन जनार्दन भामरे इयत्ता 9 वी याने डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेत सुवर्ण पदक मिळवले.राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या या परीक्षेमध्ये दर्शनने त्याच्या जिद्दीच्या जोरावर राष्ट्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या अतिशय मानाच्या परीक्षेत दैदिप्यमान कामगिरी करत सुवर्णपदकाला गवसणी घातली.याबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. त्याच्या या यशाबद्दल ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळाचे सचिव डॉ.अशोकरावजी मोहेकर यांनी कौतुक केले तसेच विद्याभवन हायस्कूल कळंबचे मुख्याध्यापक व्यंकट कुंभार,उप मुख्याध्यापक मयाचारी विक्रम, पर्यवेक्षक जगदेवी अनीगुंठे व मार्गदर्शक विनोद सागर तसेच प्रशालेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दर्शनच्या या यशाबद्दल त्याला शुभेच्छा दिल्या.
error: Content is protected !!