धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.02 एप्रिल रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 273 कारवाया करुन 2,17,250₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-मनोहर बाबुराव काळे, वय 65 वर्षे, रा.अंदोरा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.02.03.2025 रोजी 19.00 वा. सु. अंदोरा पारधी वस्ती येथे अंदाजे 3,150 ₹ किंमतीचे 90 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-लक्ष्मण बब्रुवान पवार, वय 49 वर्षे, रा.पाथर्डी ता. कळंब जि. धाराशिव हे दि.02.03.2025 रोजी 18.30 वा. सु. आपल्या राहते घरासमोर अंदाजे 2,000 ₹ किंमतीची 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
मुरुम पोलीस ठाणे:आरोपी नामे-विलास शिवाजी सुरवसे, वय 53 वर्षे, रा. कोराळ ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.02.03.2025 रोजी 18.15 वा. सु. आपल्या राहते घरासमोर मोकळे जागेत अंदाजे 2,000 ₹ किंमतीचे 20 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये मुरुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
कळंब पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान कळंब पोलीसांनी दि.02.04.2025 रोजी 17.30वा. सु. कळंब पो ठाणे हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब ते सोनार लाईन कडे जाणारे रोडच्या बाजूस कळंब येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-पाशा दगडु शेख, वय 27 वर्षे, रा. चोंदे गल्ली जुना पोलीस ठाणे जवळ कळंब ता.कळंब जि. धाराशिव हे 18.40 वा.सु. छत्रपती शिवाजी महाराज चौक कळंब ते सोनार लाईन कडे जाणारे रोडच्या बाजूस कळंब येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 940 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले कळंब पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये कळंब पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान तुळजापूर पोलीसांनी दि.02.04.2025 रोजी 17.30वा. सु. कळंब पो ठाणे हद्दीत काक्रंबा गावातील बस स्टॅन्ड जवळील मारुती मंदीरासमोर रोडवर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-महावीर कैलास पांडागळे, वय 25 वर्षे, रा. काक्रंबा ता. तुळजापूर जि. धाराशिव हे 17.30 वा.सु. काक्रंबा गावातील बस स्टॅड जवळील मारुती मंदीरासमोर रोडवर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 370 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले तुळजापूर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-अतिक पाशा ताहेर अली, वय 51 वर्षे, रा. जकापुर कॉलनी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, राजेंद्र रतन सुर्यवंशी, वय 39 वर्षे, रा. रामनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव,विनायक बाबुराव मुगळे, वय 45 वर्षे, रा. काळे प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, मल्लीकार्जुन देवराव जमादार, वय 42 वर्षे, रा. कसगी ता. उमरगा जि. धाराशिव, समीर बाबुराव देशमुख, वय 24 वर्षे, रा. हालगरा ता. निलंगा जि. लातुर, संजय समीनदार काजळे, वय 45 वर्षे, रा. मुन्सी प्लॉट उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव, शंकर सोपानराव जाधव, वय 36 वर्षे, रा. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव, किसनसिंह राजामसिंह चैव्हाण, वय 28 वर्षे, रा. बालजी नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.02.04.2025 रोजी 10.45 ते 12.50 वा. सु. आपआपल्या ताब्यातील अनुक्रमे ॲटो रिक्षा क्र एमएच 25 ए.के. 1774, ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एम1048, ॲटो रिक्षा क्र एमएच 25 ए.के. 1264, ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एम 0764, ॲटो रिक्षा क्र एमएच 25 टी.व्ही. 5930 व ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एफ 0180, ॲटो रिक्षा क्र एमएच 25 एम 1775 वॲटो रिक्षा क्र एमएच 25 के 0130 ही वाहने एनएच 65 रोड उमरगा येथे वेगवेगळ्या 8 ठिकाणी सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना उमरगा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये उमरगा पो.ठा. येथे स्वतंत्र 8 गुन्हे नोंदवले आहेत.
“रात्रगस्ती दरम्यान संशईत इसम ताब्यात”
लोहारा पोलीस ठाणे :लोहारा पो.ठा. चे पथक दि. 01.04.2025 रोजी 23.25 वा. सु. लोहारा शहरात रात्रगस्तीस असताना दरम्यान लोहारा येथील लोहारा ते जेवळी जाणारे रोडच्या बाजूला ओल सावलीत अंधाराचा दबा धरुन बसलेला एक इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्याची विचारपुस केली असता त्यानी आपले नाव-अफजल सादीक पठाण, वय 22 वर्षे, रा. शिवनगर, लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यानी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
ढोकी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-जयसिंग उत्तमराव देवकर, वय 52 वर्षे, रा. हिंगळजवाडी ता. जि. धाराशिव यांचे हिंगळजवाडी येथील हॉटेल यशराज धाब्याचा पत्रा अज्ञात व्यक्तीने दि.02.04.2025 रोजी 00.00 ते 08.00 वा. सु. उचकटून आत प्रवेश करुन फ्रिज,स्प्राईटचे तीन बॉक्स, थम्सअपचे दोन बॉक्स, स्टींगचे तीन बॉक्स रोख रक्कम 8,000₹ असा एकुण 21,980₹ किंमतीचे सामान चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-जयसिंग देवकर यांनी दि.02.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भुम पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर महादेव काळे, वय 27 वर्षे, रा. उळुप ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो एच.एफ डलिक्स कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 ए.एफ.5865 जिचा चेसी नं-MBLHA11ATG4E19917 व इंजिन नं HA11EJG4E19922 ही दि.25.03.2025 रोजी 00.30 rs 04.30वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-ज्ञानेश्वर काळे यांनी दि.01.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :आरोपी नामे-अमोल वामन जाधव रा. जहागीरदारवाडी ता. जि. धाराशिव यांनी दि.02.04.2025 रोजी 20.30 वा. सु. जहागीरदारवाडी येथे फिर्यादी नामे-अक्षय संतोष राठोड, वय 24 वर्षे, रा. जहागीरदारवाडी ता. जि. धाराशिव यांची चुलती सुनिता राठोड यांना नमुद आरोपींनी विनाकारण शिवीगाळ करत असताना फिर्यादी म्हणाले की तु शिव्या देवू नको असे बोलण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अक्षय राठोड यांनी दि.02.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 352 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-हरिदास सुनिल मुळे, रा. बामणी ता. जि. धाराशिव यांनी दि.02.04.2025 रोजी 18.00 वा. सु. बामणी येथे फिर्यादी नामे-पांडुरंग कोडाप्पा मुळे, वय 50 वर्षे, रा. बामणी ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी काही एक कारण नसताना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, फर्शीचे तुकड्याने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीची पत्नी भांडण सोडवण्यास आली असता नमुद आरोपीने त्यांनाही शिवीगाळ करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पांडुरंग मुळे यांनी दि.02.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),115(2), 351(2) (3), 333 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“फसवणुक.”
सायबर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- तानाजी दत्तु भोसले, वय 44 वर्षे, रा. जेजला ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.27.03.2025 रोजी 11.00 ते 13.30 वा. सु. मोबाईल वर जेजला येथे मोबाईल क्रं 8218728676 च्या धाराकाने बॅकेतुन बोलत आहे असे सांगुन तुमचे आय. सी. आय. बॅक खाते आपडेट करायचे आहे असा बनाव करुन आधार कार्ड व पॅन कार्ड ची माहिती घेवून तसेच व्हॉटसअप आय डी बी आय बॅक ए पी के फाईल पाठवून ती डाउनलोड करणेस लावून फिर्यादी यांचे येडेश्वरी दुध डेअरी चे आय. सी. आय.सी. आय बॅक खात्यातुन 24,47,557₹ऑनलाईन फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-तानाजी भोसले यांनी दि.02.04.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन सायबर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 318(4),सह कलम 66(सी), 66(डी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“लैंगीक अत्याचार.”
वाशी पोलीस ठाणे :एका गावातील एक 23 वर्षीय मुलगी (नाव- गावगोपनीय) माहे जुलै 2024 मध्ये ही घरात असताना गावातीलच एका तरुणाने तिस त्याचे घरात घेवून जावून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. घडल्या प्रकाराची कोठे वाच्यता केल्यास तिस व तिचे कुटुंबियांना जिवे ठार मारीन अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या पिडीतेने दि.02.04.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम-64(1), 351(2), 351 (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील