June 21, 2025

वेद शैक्षणिक संकुलाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

  • कळंब (राजेंद्र बारगुले) – धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतिश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत भैरवनाथ अध्यापक विद्यालय व भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दि.३ एप्रिल २०२५ वार गुरुवार रोजी कुळवाडी भूषण, बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य सतीश मातने यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.
    या प्रसंगी भैरवनाथ औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य सुरज भांडे,प्रा.श्रीकांत पवार,प्रा.मोहिनी शिंदे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.अविनाश घोडके,निदेशक अविनाश म्हेत्रे,निदेशक राजकुमार शिंदे,निदेशक अर्जुन मंडाळे,आदित्य गायकवाड, निदेशिका कोमल मगर,दिक्षा गायकवाड आदी संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी आणि कर्मचारी उपस्थित होते.
error: Content is protected !!