धाराशिव – जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना इलेक्टॉनिक्स (डिजिटल) वजनकाटे लावावेत, याबाबत त्वरीत आदेशीत करावे, अन्यथा लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शुक्रवारी (दि.१०) जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर यांनी दिला आहे. या निवेदनात दुधगावकर यांनी म्हंटले आहे की, धाराशिव जिल्ह्यातील ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून सुरु झालेला आहे. सालाबादाप्रमाणे शेतकरी आपला ऊस साखर कारखान्याकडे पाठवत आहेत. परंतू साखर कारखान्याकडे ऊस वाहन गेले असता संबंधीत शेतकऱ्यांना ऊसाचे वजन प्रत्यक्ष दर्शनी दिसत नाही. ही बाब साखर कारखानदार व शेतकऱ्यांच्या दृष्टीने चुकीची आहे. साखर आयुक्त यांना याविषयी यापूर्वीदेखील लेखी पत्राद्वारे कल्पना दिली असतानाही यावर्षीही साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष दर्शनी (डिजिटल) इलेक्टॉनिक्स वजनकाटे लावलेले नाहीत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांना इलेक्टॉनिक्स वजनकाटे लावणेबाबत त्वरीत आदेशीत करावे अशी मागणी केली आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी