कळंब – दि.१० नोव्हेंबर २०२३ रोजी तालुक्यातील राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि नियुक्तीचा कार्यक्रम नुकताच राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे मराठवाडा अध्यक्ष दीपक राव जाधव यांच्या उपस्थितीत पार पडला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाची ध्येयधोरणे आणि आगामी काळातील वाटचाल तसेच यापूर्वी केलेल्या विविध कामाचा आढावा या बैठकीमध्ये मांडण्यात आला. सध्या परिस्थितीत राजकीय व सामाजिक परिस्थिती याबद्दल मेळाव्यात सर्व सदस्यांनी चर्चा केली. या वेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या युवक आघाडीच्या जिल्हाध्यक्षपदी ढोकी येथील महादेव गाढवे यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच जोतिराम कोरे जिल्हाउपाध्यक्ष, किसान सेलच्या जिल्हाध्यक्षपदी पांडुरंग लोकरे, कळंब तालुकाध्यक्षपदी निलेश पांचाळ तर तालुका सचिव म्हणून इटकूर येथील सुभाष अशोकराव मैन्दाड यांची नियुक्ती करण्यात आली. राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघाच्या कळंब तालुका सरचिटणीस पदी तालुका कृषी विभागाचे भुजंग लोकरे यांची नियुक्ती करण्यात आली. निवडपत्र देण्यासाठी कळंब चे माजी नागराध्यक्ष पांडुरंग तात्या कुंभार,मराठवाडा अध्यक्ष दिपकराव जाधव, कर्मचारी अधिकारी महासंघांचे जिल्हाध्यक्ष संतोष भोजने यांच्यासह तानाजी माळी, मनोज माळी,अतुल लोहार, शहाजी कांबळे,तानाजी कोळी,नितीन वाडे, दादासाहेब कोळी,बाप्पा बोन्दर, सावता माळी, सचिन डोरले,विशाल कुंभार, भैया उलगे,हरिभाऊ कुंभार,मंगेश अष्टेकर, संतोष भांडे, डिकसळचे सरपंच नानासाहेब धाकतोडे, प्रेमचंद गोरे, दादासाहेब कोळी, हरिभाऊ जाधव, सचिन कडबणे, बळीराम कस्पटे,यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड