August 9, 2025

चवदार तळे क्रांती सत्याग्रह निमित्त महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना

  • कळंब – येथील विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा परिसरात डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रह दिनानिमित्त दि.२० मार्च २०२५ रोजी महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मानवंदना देण्यात आली.
    या प्रसंगी स्मारक समितीचे प्रमुख तथा माजी नगरसेवक सुनील गायकवाड,शिवाजी शिरसाट,राजाभाऊ गायकवाड, सुमित रणदिवे,भाऊसाहेब कुचेकर यांच्यासह मोठ्या संख्येने आंबेडकर अनुयायी व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
    यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक महत्त्वाच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या आठवणींना उजाळा दिला व त्यांच्या विचारांचे स्मरण करत सामाजिक समतेचा संदेश दिला.
error: Content is protected !!