कळंब – ग्रामीण भारतात शिक्षणाच्या अभावामुळे अनेक तरुणांना बेरोजगारीचा सामना करावा लागतो.मात्र,अशा परिस्थितीत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून परिवर्तन घडवले.त्यांनी केवळ शिक्षण प्रसारावर भर न देता, डॉ.अशोकराव मोहेकर यांनी मार्गदर्शनाखाली मल्टिस्टेट व अँग्रो इंडस्ट्रीजच्या माध्यमातून ग्रामीण युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. मोहेकर गुरुजींनी शैक्षणिक क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी त्यांनी विविध योजना आणि उपक्रम राबवले. त्यांनी आधुनिक शिक्षणपद्धतींचा अवलंब करत विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञान न देता,व्यावहारिक ज्ञानही दिले. त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी मिळाली.त्यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थांमधून हजारो विद्यार्थी शिकून समाजात आपली स्वतंत्र ओळख निर्माण करू लागले. ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करण्यावर त्यांनी विशेष भर दिला. त्यांनी व्यावसायिक प्रशिक्षण केंद्रे सुरू करून युवकांना विविध कौशल्यांचे प्रशिक्षण दिले.शेतीपूरक उद्योग,लघुउद्योग,संगणक शिक्षण आदी क्षेत्रांत तरुणांना प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर बनवले. त्यांच्या या उपक्रमामुळे अनेक युवकांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला,तर काहींना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या.परिणामी, ग्रामीण भागातील आर्थिक परिस्थितीत सुधारणा झाली आणि स्थलांतराची समस्या कमी झाली. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी शिक्षण आणि रोजगाराच्या माध्यमातून संपूर्ण ग्रामीण समाजाच्या प्रगतीस हातभार लावला. त्यांच्या कार्यामुळे शिक्षणाचे महत्त्व वाढले. शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी हे केवळ शिक्षक नव्हते, तर ते एक समाजसुधारकही होते. त्यांनी ग्रामीण भागातील शिक्षण आणि रोजगाराचा चेहरामोहरा बदलला.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे आजही हजारो युवक शिक्षित होत आहेत आणि आत्मनिर्भर होत आहेत. त्यांच्या कार्यामुळे ग्रामीण भारताला नवीन दिशा मिळाली आणि खऱ्या अर्थाने एक शैक्षणिक व औद्योगिक क्रांती घडली.म्हणून ज्ञान प्रसारक मंडळाचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मराठवाड्यातील विविध ठिकाणी दि.२० मार्च २०२५ वार गुरुवार रोजी मराठवाड्यात विविध ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
शि.म.ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात ग्रंथपाल अनिल फाटक यांच्या हस्ते पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्राचार्य डॉ.हेमंत भगवान,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक अरविंद शिंदे,कार्यकारी संपादक अविनाश घोडके व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
विद्याभवन हायस्कूल,कळंब येथे मुख्याध्यापक कुंभार व्ही.जी यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी प्रशालेचे उपमुख्याध्यापक मायाचारी व्ही एस,माने एस डी,पाटील एस एस, सोनके जे एस हे उपस्थित होते.
भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुलमध्ये मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सहशिक्षिक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजितकुमार जाधव,बबन यादव आदींनी अभिवादन केले.
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील सहशिक्षक कमलाकर शेवाळे,श्रीमती पांचाळ उषा,जाधव पांडुरंग विद्यार्थी,विद्यार्थिनी यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात