धाराशिव (जिमाका) – सन २०२४ -२५ पासून क्रीडागुण सवलतीचे अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकृत केले जाणार आहेत,असे शासनाच्या १४ जानेवारी २०२५ च्या पत्रानुसार कळविण्यात आले आहे.त्यानुसार आपले सरकार प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्य शिक्षण मंडळाने १० वी व १२ वीच्या परीक्षांचे निकाल १५ मे २०२५ पूर्वी जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे क्रीडागुण सवलतीचे अर्ज १५ एप्रिल २०२५ पूर्वी विभागीय शिक्षण मंडळांकडे पाठविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शासन निर्णयानुसार,क्रीडागुण सवलतीसाठी अर्ज करण्यासाठी ११ एप्रिल २०२५ पर्यंत ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज स्वीकारले जातील. ११ एप्रिलनंतर प्राप्त होणारे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांचे प्राचार्य,मुख्याध्यापक आणि क्रीडा शिक्षक यांनी संबंधित खेळाडूंचे अर्ज विहीत वेळेत सादर करावेत.अन्यथा विद्यार्थी क्रीडागुण सवलतीपासून वंचित राहतील,याची जबाबदारी संबंधित संस्थांची राहील, असे जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी स्पष्ट केले आहे.
More Stories
धाराशिव प्रशालेत क्रांती दिन उत्साहात साजरा
सोनवणे यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी