June 20, 2025

शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना विविध ठिकाणी अभिवादन

  • कळंब (अविनाश घोडके) – मराठवाड्यातील अन्याय,दडपशाही आणि निजामकालीन दहशतीच्या काळात,कसलीही दळणवळणाची साधने नसतानाही सन १९५१ मध्ये ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळाची स्थापना करून धाराशिव जिल्ह्यातील मोहा या गावी पहिली शाळा चालू करून बहुजन समाजातील मुलांसाठी मराठवाड्यात विविध ठिकाणी शिक्षणाची ज्योत पेटवणारे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांना ज्ञान प्रसारक मंडळ मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने दि.१३ नोव्हेंबर २०२५ वार गुरुवार रोजी मराठवाड्यात विविध ठिकाणी कृतज्ञतापूर्वक अभिवादन करण्यात आले.
    शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची गंगा घराघरात पोहोचवण्याचा निर्धार केला होता.त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे मराठवाड्यातील अनेक शेतकरी,गरीब व वंचित कुटुंबांची मुले शिक्षणाच्या प्रवाहात आली.त्यांनी शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी हत्यार असल्याची जाणीव जनसामान्यांमध्ये निर्माण केली.
  • आज त्यांच्या शैक्षणिक कार्यास स्मरण म्हणून विविध शाळा, महाविद्यालयाच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी मोहेकर गुरुजींच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प केला.

  • शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथील गुरुजींच्या पुतळ्यास प्रा.डॉ.विश्वजीत मस्के यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी सचिव डॉ.अशोक मोहेकर,ज्ञानोद्योग विद्यालय येरमाळाचे प्राचार्य शिवाजी पौळ व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक,प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
  • ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव (आण्णा) मोहेकर गुरूजींना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.
    यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश (भाऊ) मोहेकर , प्रा.दिग्विजय पाटील,प्रा.राहुल भिसे,डी.बी.मडके,जनार्दन भामरे,अशोक राऊत,धनंजय परजणे,बालाजी काळे,अमर बापू आदी जण उपस्थित होते.
  • विद्याभवन हायस्कूल कळंब येथे शिक्षण महर्षी कै.ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (अण्णा) यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
    याप्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
  • विद्या विकास हायस्कूल कन्हैरवाडी येथे कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरूजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    याप्रसंगी हायस्कूल मधील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
  • भूम तालुक्यातील आष्टा येथील विद्यामंदिर हायस्कुलमध्ये शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
    याप्रसंगी सहशिक्षिक शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,बबन यादव व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
  • ज्ञानदीप तेवत ठेवणाऱ्या या महान शिक्षणपुरुषाला शतशः प्रणाम!
error: Content is protected !!