कळंब – कळंब तालुक्यातील मांजरा नदी पात्रातील कळंब शहर ते खोंदला गावापर्यंत असणारे जुणे कोल्हापूरी बंधारे बॅरेजेसमध्ये रूपांतरित करून कळंबचा दुष्काळग्रस्त शिक्का पुसून काढण्याची मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळंबकरांच्या वतीने १० मार्च २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी,कळंब यांच्यामार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, कळंब तालुक्यातील कळंब शहर ते खोंदला गावच्या मांजरा नदीतील अस्तित्वात असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला दरवाजे नसल्यामुळे नदी पात्रात पाणी थांबत नाही.परिणामी रब्बी हंगामातील पिके जगण्यासाठी नदीपात्रात पाणी राहत नाही. पाणी थांबत नसल्यामुळे परिसरातील विहिरीची व बोरवेलची पाणी पातळी खालावली असल्यामुळे जानेवारी- फेब्रुवारी महिन्यातच बंद पडतात.त्यामुळे शेतकऱ्यांना पिण्यासाठी व पिकांना पाणी उपलब्ध होत नाही.विशेष म्हणजे पशु-पक्षांना देखील पाण्यासाठी भटकंती करावी लागते.शाश्वत पाणी उपलब्ध करून देण्यासाठी जुने कोल्हापुरी बंधारेचे रूपांतर नवीन बॅरेजेसमध्ये केल्यास कळंब तालुका दुष्काळी असल्याचा कलंक पुसून निघण्यास मदत होणार आहे. मागणीचा गंभीर्याने विचार न झाल्यास १ मे रोजी बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर अँड.मनोज चोंदे, अशोक शिंदे,संजीवनी वाघमारे, चक्रधर चोंदे,सुदर्शन कोळपे, अमित जाधव,विलास करंजकर, कमलाकर पाटील,बाळासाहेब कथले,अरुण चौधरी,गजानन चोंदे आदी शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून या निवेदनाची प्रत पालकमंत्री,ना.प्रताप सरनाईक,खा.ओमराजे निंबाळकर,आ.कैलास पाटील,धाराशिव जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.
More Stories
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका प्रा.सौ.अंजलीताई मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट