- कळंब – शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात जागतिक महिला दिनानिमित्त अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, सावित्रीबाई फुले युती मंच, समाजशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शिवमती बोराडेताई भगवानराव (बालविकास प्रकल्प अधिकारी,कळंब) यांनी भारतीय महिलांची सद्यस्थिती या विषयावर संवाद साधला तसेच डॉ.सुकेशनी थोरात (सहाय्यक प्राध्यापक डॉ.आंबेडकर लॉ कॉलेज,छत्रपती संभाजी नगर) यांनी महिलांचे हक्क या विषयावर मार्गदर्शन केले. याप्रसंगी समान हक्क समान संधी समान शक्ती या जागतिक थीमनुसार विद्यार्थ्यांसाठी वेशभूषा स्पर्धा आयोजित केली होती.१६ विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.या स्पर्धेमध्ये तेजस्विनी गुजर (प्रथम ),झीनत मुल्ला ( द्वितीय),ज्ञानेश्वरी पांचाळ ( तृतीय),प्रांजली शिनगारे ( उत्तेजनार्थ),अनुजा थोरबोले( उत्तेजनार्थ) यांना पुरस्कार मिळाले.स्पर्धेचे पुरस्कार संस्थेचे सचिव प्रा.डॉ.अशोकराव मोहेकर व संस्थेचे संचालक , सिनेट सदस्य प्रा.डॉ.संजय कांबळे च्या हस्ते वितरण झाले.या स्पर्धेचे परीक्षण डॉ. मीनाक्षी भवर आणि डॉ.मीना साखळकर यांनी केले.महिलांच्या कार्याला सन्मान म्हणून महिलांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हेमंत भगवान सर यांनी आजची स्त्री ही सर्व क्षेत्रात अग्रेसर आहे असे मत मांडले.या कार्यक्रमाचे आयोजन डॉ.ईश्वर राठोड,डॉ. दत्ता साकोळे,डॉ.राघवेंद्र ताटीपामुल,डॉ.संदीप महाजन, प्रा.शाहरुख शेख यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मीनाक्षी जाधव आणि प्रास्ताविक अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.अर्चना मुखेडकर तर आभार डॉ. वर्षा सरवदे यांनी केले. या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ.कलाकार जाधव,प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी,प्रा डॉ.नागनाथ आदाटे,प्रा.डॉ.दत्ता साकोळे,प्रा.डॉ.ज्ञानेश शिंदे,प्रा. ऋतुजा मिटकरी,प्रतिभा भवर, प्रा.पुष्पा कदम,प्रा.सुषमा घाटपारडे,प्रा.अर्चना पाटील,प्रा.अश्विनी खंडागळे,प्रा. प्रणिता खोसे,प्रा.शिवकन्या मांडे,प्रा.रोहिणी कदम,प्रा. ऋतुजा मितकरी,सुनंदा झांबरे, मनीषा लिमकर,संगीता. रूमने,सुरेखा आंबिरकर,मीना पाडोळे हे उपस्थित होते.तसेच बहुसंख विद्यार्थिनी विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव, अरविंद शिंदे,संदीप सूर्यवंशी, संतोष मोरे,अर्जुन वाघमारे,जया पांचाळ,आदित्य मडके,रमेश भालेकर यांनी सहकार्य केले.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन