धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.06 मार्च रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 275 कारवाया करुन 2,54,900 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे:आरोपी नामे-रमेश राजाभाउ पवार, वय 22 वर्षे, रा. वरुडा पारधी पिडी ता. जि. धाराशिव हे दि.06.03.2025 रोजी 13.30 वा. सु. पारधी वस्ती जवळ बापू भगवान पवार यांचे शेतामध्ये अंदाजे 18,000₹ किंमतीचे 400 लिटर गुळमिश्रीत रासायनिक द्रव व 70 लिटर गवठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
लोहारा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान लोहारा पोलीसांनी दि.06.03.2025 रोजी 11.50 ते 20.00 वा. सु. लोहारा पो ठाणे हद्दीत 3 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-मोहम्मद अल्लाबक्ष शेख, वय 35 वर्षे,रा. माकणी ता. लोहारा जि. धाराशिव हे 11.50 वा.सु डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक लोहारा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,280 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले लोहारा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-कलीम अलीमोद्दीन शेख, वय 33 वर्षे, रा. पेठसांगवी ता. लोहारा जि. धाराशिव हे 14.30 वा.सु आपल्या राहत्या घरासमोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,290 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले लोहारा पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-रियाज रज्जाक खडीवाले, वय 30 वर्षे, रा.लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव हे 20.00 वा.सु. दगडू इनामदार यांचे गाळ्या मध्ये ऑनलाईन चक्री जुगाराचे साहित्यासह एकुण 11,500 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले लोहारा पो. ठाणेच्या पथकास आढळले.यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये लोहारा पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
भुम पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान भुम पोलीसांनी दि.06.03.2025 रोजी 18.15 वा. सु. भुम पो ठाणे हद्दीत आठवडी बाजार भुम येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-अंकुश कल्याण पवार, वय 49 वर्षे, रा.इंदीरानगर भुम ता. भुम जि. धाराशिव हे 18.15 वा.सु आठवडी बाजार भुम येथे सुरट जुगाराचे साहित्यासह एकुण 860 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले भुम पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये भुम पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-रोहन मोहन कांबळे, वय 25 वर्षे, रा. वाघोली ता. जि. धाराशिव हे दि.06.03.2025 रोजी 11.00 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 बीडी 5477 ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बसस्थानक इन गेट येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम-185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द आनंदनगर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-शिवाजी बाबू राउत, वय 53 वर्षे, रा. वसंतनगर नळदुर्ग ता.तुळजापूर जि. धाराशिव हे दि.06.03.2025 रोजी 23.00 वा. सु.आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एए 7536 ही चंद्रकांत बार समोर रोडवर नळदुर्ग येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम-185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“खुन.”
तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे-गणेश घाटशिळे, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव, समाधान सपंत शिंदे, वय 24 वर्षे,रा. धारुर ता.जि. धाराशिव यांनी दि. 05.03.2025 रोजी 19.00 वा. पुर्वी बार्शी रोड येथील सिंदफळ शिवारामध्ये मयत नामे-सत्तार यासीम ईनामदार, वय 55 वर्षे, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव नमुद आरोपींनी अज्ञात कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मोटरसायकलचे शॉकअब्जर स्टील रॉडने मारहाण करुन जिवे ठारे मारले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-वसीम गफुर ईनामदार, वय 35 वर्षे, रा. सिंदफळ ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.06.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 103(1),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-दिलीप सुब्राव शिंदे, रा.मांडवा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 02.03.2025 रोजी 18.00 वा. सु.मांडवा येथे फिर्यादी नामे-पुजा रामकिसन शिंदे, वय 40 वर्षे, रा. मांडवा ता. वाशी जि. धाराशिव यांना व त्यांचे पती रामकिसन व मुलगी संध्या यांना नमुद आरोपींनी पाहुण्याचे पैसे का दिले नाही व दाखल केलेले प्रकरण का मिटवले नाही या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. पुजा शिंदे यांना लाकडाने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-पुजा शिंदे यांनी दि.06.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(2),115(2), 352, 351(2), 351(3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे :आरोपी नामे-रामराजे अभिमान मस्तुद, रा.माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 03.03.2025 रोजी 18.30 वा. सु.माणकेश्वर येथे फिर्यादी नामे-सागर सुरेश पवार, वय 29 वर्षे, रा. माणकेश्वर ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने त्याचे चप्पलचे दुकानासमोर बसल्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सागर पवार यांनी दि.06.03.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
कळंब पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अविनाश भास्कर बावणे, वय 55 वर्षे, रा. आढाळा ता. कळंब जि. धाराशिव यांचे आढाळा शिवारातील शेत गट नं 321 व 06 मधील व त्यांचे शेता शेजारील दशरथ बाबुराव वायसे यांच्या नीरज कंपनीची पानबुडी 5 एच पी मोटर व व्हर्टीकल ॲन्सन कंपनीची पानबुडी 5 एच पी मोटर अंदाजे 24,000₹ किंमतीच्या दि.03.03.2025 रोजी 19.00 ते दि. 04.03.2025 रोजी 05.00अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अविनाश बावणे यांनी दि.06.03.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
बँकांनी पिक कर्जासह अन्य योजनांसाठी कर्ज वेळेत उपलब्ध करुन द्यावेत – जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होणार
मनाने मोठे… दिलदार मनाचे… संवेदनशील व्यक्तिमत्त्व-डॉ.प्रतापसिंह (भैय्यासाहेब) पाटील