June 20, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.28 फेब्रुवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 396 कारवाया करुन 3,44,150 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • मा.पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली काल शुक्रवार दि.28.02.2025 रोजी अवैध मद्य विरोधी धाराशिव जिल्हयात पोलीस ठाणे हद्दीत 14 कारवाया करण्यात आल्या. या छाप्यात घटनास्थळावर आढळलेले सुमारे 470 लिटर गावठी दारु, 30 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव व देशी विदेशी दारुच्या 59 सिलबंद बाटल्याअसे मद्य जप्त करण्यात आले. सदर जप्त मद्य यांची एकत्रीत किंमत अंदाजे 57,545 ₹ आहे. यावरुन महाराष्ट्र मद्य मनाई कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 14 गुन्हे खालीलप्रमाणे नोंदवण्यात आले आहेत.
  • 1)ढोकी पो ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-कमल सुभाष राठोड, वय 50 वर्षे, रा. आरणी ता.जि. धाराशिव या 12.30 वा. सु. आरणी येथे अंदाजे 4,000 किंमतीची 50 लिटर गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-जनाबाई दिनकर चव्हाण, वय 65 वर्षे, रा.राजेश नगर पारधी पिडी, ढोकी ता. जि. धाराशिव या 17.15 वा. सु. राजेशनगर पारधी पिढी ढोकी येथे अंदाजे 6,000 किंमतीची 60 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. आरोपी नामे-ज्ञानेश्वर भगवान पाटील, वय 38 वर्षे, रा.काजळा ता. जि. धाराशिव हे 16.50 वा. सु. काजळा जाणारे रोड लगत शिवनेरी हॉटेलच्या बाजूला अंदाजे 5,000 किंमतीची 50 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 2)बेंबळी पो ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-दस्तया उमेश गुतेदार, वय 29 वर्षे, रा. अंबेजवळगा ह.मु. बेंबळी ता. जि. धाराशिव हे 13.15 वा. सु. बेंबळी येथे अंदाजे 10,500 किंमतीची 105 लिटर गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.आरोपी नामे-भिमाश्ंकर जगन्नथ गुत्तेदार, वय 27 वर्षे, रा. समुद्रवाणी ता. जि. धाराशिव हे 16.30 वा. सु. समुद्रवाणी तांडा जवळ ज्ञानेश्वर जंगाले यांचे शेतातील अधर्वट बांधकामाचे बाजूस अंदाजे 3,000 किंमतीची 30 लिटर सिंधी ताडी अम्ली द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-सत्यवान बलभिम आदटराव, वय 65 वर्षे, रा. करजखेडा ता. जि. धाराशिव हे 18.20 वा. सु. नांदुर्गा शिवारात धुत्ता
  • पाटीजवळ धुत्ता पाटी ते बेंबळी जाणारे रोडचे दक्षिण बाजूस पानटपरीच्या पाठीमागे अंदाजे 1,120 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • 3)लोहारा पो ठाणेच्या पथकाने 3 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-अतिश पांडुरंग दुनगे, वय 29 वर्षे, रा. तोरंबा ता. लोहारा. जि. धाराशिव हे 19.10 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 2,500 किंमतीची 25 लिटर गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.आरोपी नामे-लक्ष्मण रंगराव यलोरे, वय 38 वर्षे, रा. सास्तुर ता. लोहारा जि.धाराशिव हे 18.15 वा. सु. सास्तुर गावातील बाजार कट्ट्याजवळ अंदाजे 1,040 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-तिरुपती परशुराम उत्काम, वय 36 वर्षे, रा. कानेगाव ता. लोहारा जि. धाराशिव हे 18.40 वा. सु. आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 1,280 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या
  • 3)उमरगा पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-अलीम नबी शेख, वय 34 वर्षे,रा.हमीदनगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 18.30 वा. सु. सलुन दुकान शेजारी मोकळ्या जागेत हमीदनगर उमरगा येथे अंदाजे 4,200किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-प्रकाश माणिक माशाळे, वय 58 वर्षे,रा. गुंजोटीरावाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे 17.25 वा. सु. गुंजोटीवाडी येथे आपल्या शेतालगत असलेल्या पत्राचे शेडसमोर अंदाजे 4,800किंमतीची 60 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली.
  • 4)धाराशिव शहर पो ठाणेच्या पथकाने 2 ठिकाणी छापे टाकले. आरोपी नामे-शाम संजय आकाडे, वय 29 वर्षे,रा.काकानगर, सांजा चौक धाराशिव जि. धाराशिव हे 19.40 वा. सु. वडार गल्ली जाणारे रस्त्याजवळ सुपर एग्ज ॲण्ड कोल्डींक्स समोर धाराशिव येथे अंदाजे 5,125 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-कोमल सुरेश पवार, वय 30 वर्षे,रा.पारधी पिडी धाराशिव ता. जि. धाराशिव या 19.30 वा. सु. एलआयसी ऑफीसच्या पाठीमागे धाराशिव येथे अंदाजे 8,000 किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या
  • 5)आंबी पो ठाणेच्या पथकाने ठिकाणी छापा टाकला. आरोपी नामे-बबन कालीदास तिंबोळे, वय 50 वर्षे,रा.कंडारी ता. परंडा जि. धाराशिव हे 17.00 वा. सु. आनाळा ता. परंडा येथे आनाळा ते परंडा जाणारे रोडजवळ हॉअेल तिरुपती येथे अंदाजे 980किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 14 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.28.02.2025 रोजी 13.50 ते 19.10 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत 3 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-बबन गोरोबा तट, वय 37 वर्षे, रा. तुळजापूर नाका, धाराशिव ता. जि. धाराशिव हे 13.50 वा.सु आडत लाईनचे बाजूस धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,310 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-पाशा जिलानी तांबोळी, वय 44 वर्षे, रा.गल्ली नं 03 खाजा नगर, धाराशिव ता. जि. धाराशिव, हे 16.50 वा.सु सांजा जाणारे रोड लगत धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 875 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-आकाश पांडुरंग केदार, वय 30 वर्षे, रा. इंगळे गल्ली धाराशिव ता.जि. धाराशिव, हे 19.10 वा.सु. चक्री मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 20,800 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.
  • ढोकी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान ढोकी पोलींसानी दि.28.02.2025 रोजी 15.40 ते 17.30 वा. सु. ढोकी पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे- आबासाहेब निवृत्ती हिंगे, वय 60 वर्षे, रा. कसबे तडवळे ता. जि. धाराशिव हे 15.40 वा.सु बस स्टॅण्डचे समोर कसबे तडवळे येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,170 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-गफार बापु मुलाणी, वय 34 वर्षे, रा.दुधगाव ता. जि. धाराशिव, हे 17.30 वा.सु बाजार पेठ कसबे तडवळे येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,100 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले ढोकी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • येरमाळा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.28.02.2025 रोजी 13.15 वा. सु. येरमाळा पो ठाणे हद्दीत येरमाळा येथे बसस्थानक परिसरात छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-वैभव दिपक भोईटे, वय 25 वर्षे, रा.लक्ष्मी पार्वती नगर, येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे 13.15 वा.सु कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 2,000 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • बेंबळी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान बेंबळी पोलींसानी दि.28.02.2025 रोजी 15.50 ते 13.20 वा. सु. बेंबळी पो ठाणे हद्दीत 2 ठिकाणी छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-दिपक अशोक वाघुलकर, वय 35 वर्षे, रा. बेंबळी ता. जि. धाराशिव हे 15.50 वा.सु पाटोदा येथे बसस्थानक जवळ वडाचे झाडाखाली रोडवर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 430 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले बेंबळी पो. ठाणेच्या पथकास आढळले. तर आरोपी नामे-ज्ञानदेव रामा ढोले, वय 60 वर्षे, रा.पाटोदा ता.जि. धाराशिव, हे 13.20 वा.सु पाटोदा येथे बसस्थानक जवळ वडाचे झाडाखाली रोडवर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 340 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले बेंबळी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये बेंबळी पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • बेंबळी पोलीस ठाणे :दि.26.01.2025 रोंजी 14.00 ते दि. 22.02.2025 रोजी 16.00 वा. सु. करजखेडा आठवडी बाजाराचे पाण्याचे टाकीजवळ महाराष्ट्र जिवन कार्यक्रमाअंतर्गत कानेगाव व करजखेडा संयुक्त पाणीपुरवठा योजनेसाठी ठेवलेले वेल्सपन डीआय पाईप कंपनीचे प्रत्येकी 150 मिमी व्यासाचे 5.5 मिटर लांबीचे काळ्या रंगाचे 35 लोखंडी पाईप व वेल्सपन डीआय पाईप कंपनीचे प्रत्येकी 100 मिमी 5.5 लांबीचे 30 लोखंडी पाईप असे एकुण 5,74,805₹ किंमतीचा माल अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राजाभाउ शिवाजी गडकर, वय 60 रा. रामनगर लक्ष्मी कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांनी दि.28.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- श्वेता ज्ञानेश्वर जाधव, वय 25 वर्षे, रा. होळी ता. लोहारा जि. धाराशिव या दि.16.01.2025 रोजी 15.00 ते 16.30 वा. सु.रिक्षातुन नारंगवाडी पाटी ते एकोंडीवाडी प्रवास करत असताना अनोळखी दोन महिलांनी श्वेता जाधव यांचे प्रवासी बॅग मधील 5 तोळे 3 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे 1,40,000₹ किंमतीचे चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-श्वेता जाधव यांनी दि.28.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 (2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-ज्ञानशे गोविंद मोरे रा. गिरवी ता. माळशीरस जि. सोलापूर यांनी दि. 27.02.2025 रोजी 17.00 वा. सु. शेंडी शिवारातील हॉटेल रानवारा समोर फिर्यादी नामे-अविनाश सुर्यभान डोरले, वय 48 वर्षे, रा. तांदुळवाडी ता. वाशी जि. धाराशिव यांची बहिण मनिषा ज्ञानेश मोरे व नमुद आरोपीचे झालेल्या भांडणाचे कारणावरुन फिर्यादी व त्यांची पत्नी हे पारगाव येथुन तांदुळवाडी येथे मोटरसायकलला जात असताना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने नमुद आरोपीने त्याचे ताब्यातील बोलेरो जिप क्र एमएच 45 एन 1972 ने भरधाव वेगात चालवून समोरुन जोराची धडक देवून फिर्यादी व त्यांची पत्नीस गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अविनाश डोरले यांनी दि.28.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम109, 118(2), 118(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • बेंबळी पोलीस ठाणे :आरोपी नामे-ओम मधुकर पवार, मधुकर भगवान पवार दोघे रा. पाडोळी ता. जि. धाराशिव यांनी दि. 25.02.2025 रोजी 14.00 ते 14.30 वा. सु.पाडोळी येथे फिर्यादी नामे-किरण मोतीलाल पवार, वय 41 वर्षे, रा. पाडोळी ता. जि. धाराशिव यांना पत्र्याचे शेडचे पत्रे काढण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-किरण पवार यांनी दि.28.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन बेंबळी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम118(2), 115(2), 351(2)3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • शिराढोण पोलीस ठाणे :आरोपी नामे- सुनंदाबाई गणपती माळी, वय 55 वर्षे, रा. नागझरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि. 25.02.2025 रोजी 16.30 वा. सु.नागझरवाडी येथे फिर्यादी नामे-प्रियंका भगिरथ माळी, वय 28 वर्षे, रा. नागझरवाडी ता. कळंब जि. धाराशिव यांचा मुलगा नामे उदय भगीराथ माळी, वय 7 वर्षे यास नमुद आरोपीने देवाचा प्रसाद खा असे म्हणून दिल्याने फिर्यादीचा मुलास उलट्या होवून तब्येत बिघडल्याने फिर्यादीवे पती भगीरथी माळी हे नमुद आरोपीस विचारण्याकरीता गेले असता शिवीगाळ करुन तुजा वंश वाढु देणार नाही अशी धमकी देवून डोळ्यात लाल मिरची पावडर फेकण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-प्रियंका माळी यांनी दि.28.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम123,352, 3513) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “अपघात.”
  • वाशी पोलीस ठाणे: आरोपी नामे- रोहन गपाट, प्रतिक पारडे, एम.एस.इ.बी. चे उपअभियंता चौधरी, शाखा अभियंता तुरखुडे, ऑपरेटर अशोक जगताप, लाईनमन प्राची देवळे यांनी मयत नामे-हेमंत विष्णु मोटे, वय 33 वर्षे, रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव हे दि. 11.12.2024 रोजी 12.00ते दि. 01.00 वा. सु. गोलेगाव व वाशी शिवारातील 11 केव्ही लाईटचे पोलीवर चडवून मयत हेमंत मोटे यास इलेक्ट्रीक शॉक लागुन उपचार दरम्यान मयत झाला आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विष्णु विठ्ठलराव मोटे, वय 55 वर्षे, रा. पारगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.28.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106(1), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!