कळंब – येथील छत्रपती शिवाजी महाविद्यालयामध्ये वि. वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मराठी भाषा गौरव दिन’ दिनांक २७ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा करण्यात आला. यावेळी विष्णु वामन शिरवाडकर, संस्थेचे संस्थापक कै.नरसिंग (अण्णा) जाधव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य जाधवर एस.एस.हे होते तर या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा.डॉ.हनुमंत माने हे उपस्थित होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना कुसुमाग्रजांच्या साहित्याची आणि कार्याची ओळख करून दिली. व्यासपीठावर आयक्यूएशीचे समन्वयक प्रा.डॉ.अनिल जगताप ,प्रा.पंडित शिंदे,प्रा.शफिक चौधरी ,प्रा. नामदेव तोडकर प्रमुख उपस्थितीमध्ये उपस्थित होते.यावेळी प्रा.डाॅ.अनिल जगताप यांनी विद्यार्थ्यांना भाषेचे महत्त्व पटवून दिले.महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ‘काव्यवाचन स्पर्धा’ घेण्यात आली. या स्पर्धेमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या स्वरचित कवितेचे सादरीकरण केले.अध्यक्षीय समारोपामध्ये प्राचार्य जाधवर एस. एस.यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे सामर्थ्य आणि तिला अभिजात भाषा म्हणून दिलेली मान्यता कशी सार्थ आहे हे पटवून दिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.शफिक चौधरी यांनी तर आभार प्रा.डाॅ.महेश पवार यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुंदर कदम, दत्तात्रय गायकवाड,दत्तात्रय कांबळे तसेच प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात