June 21, 2025

धाराशीव जिल्हा पोलीस नामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.25 फेब्रुवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 425 कारवाया करुन 3,52,500 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • लोहारा पोलीस ठाणे:आरोपी नामे-नितीन मोहन माने, वय 35 वर्षे रा.आशीव ता. औसा ह.मु. पेठसांगवी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.25.02.2025 रोजी 16.00 वा. सु. पेठसांगवी येथे अंदाजे 1,280 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 16 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-संभाजी हरीबा पालमपल्ले, वय 26 वर्षे, रा.कोळेवाडी ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.25.02.2025 रोजी 16.15 वा. सु. कोळेवाडी शिवारातील आई पाटी येथे अंदाजे 11,220 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 109 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे:आरोपी नामे-सुभाष गणेश लिडोरिया, वय 35 वर्षे रा.येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.25.02.2025 रोजी 14.30 वा. सु. येरमाळा येथे चुन्याच्या रानात बाभळीच्या झाडाखाली मोकळ्या जागेत अंदाजे 6,950 ₹ किंमतीची 65 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर आरोपी नामे-शरद सिकंदर पवार, वय 33 वर्षे रा.वाघोली ता. कळंब जि. धाराशिव हे दि.25.02.2025 रोजी 16.20 वा. सु. आपल्या राहत्या घराचे कोपीमध्ये वाघोली येथे अंदाजे 18,000 ₹ किंमतीची 35 लिटर गावठी दारु व 180 लिटर गावठी दारु निर्मीतीचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • येरमाळा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान येरमाळा पोलीसांनी दि.25.02.2025 रोजी 11.30वा. सु. येरमाळा पो ठाणे हद्दीत वडगाव गावातील मारुती मंदीरा समोर छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-गोरोबा उर्फ शंकर शहाजी शेटे, वय 37 वर्षे, रा. वडगाव ज. ता. कळंब जि. धाराशिव हे 11.30 वा.सु वडगाव गावातील मारुतीचे मंदीरा समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 850 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले येरमाळा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये येरमाळा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.24.02.2025 रोजी 21.10 वा. सु. धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत धाराशिव ते तुळजापूर जाणारे रोडवर तुळजाई पान स्टॉल चे बाजूस छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-राजु बब्रुवान निंबाळकर, वय 52 वर्षे, रा. सांजा रोड, धाराशिव ता. जि. धाराशिव हे 21.10 वा.सु धाराशिव ते तुळजापूर जाणारे रोडवर तुळजाई पान स्टॉल चे बाजूस मिलन नाईट जुगाराचे साहित्यासह एकुण 970 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.25.02.2025 रोजी 15.10 वा. सु. उमरगा पो ठाणे हद्दीत महादेव रेस्टॉरंट चे समोर उमरगा येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-राजेंद्र भिमराव जमादार, वय 62 वर्षे, रा. शासकीय झोपडपट्टी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे 15.10 वा.सु महादेव रेस्टॉरंट चे समोर उमरगा येथे मिलन डे जुगाराचे साहित्यासह एकुण 1,520 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले उमरगा पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12(अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • वाशी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-लक्ष्मण बापुराव महाडीक, वय 54 वर्षे, रा.महाडीक वस्ती, अंजनसोंडा ता. भुम जि. धाराशिव हे दि. 24.02.2025 रोजी 23.00 ते दि. 25.02.2025 रोजी 02.30 वा. सु. राहते घरात झोपलेले असताना अज्ञात व्यक्तीने त्यांचे घराचे चैनल गेटचे कुलूप तोडून आत प्रवेश करुन 15 तोळे 5 ग्रॅम सोन्याचे दागिने व रोख रक्कम 40,000₹ असा एकुण 8,65,000₹किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- लक्ष्मण महाडीक यांनी दि.25.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(4), 305 (अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-रविकिरण दामोदर गाढवे, वय 34 वर्षे, रा. वडगांव(लाख) ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची टेम्सो कंपनीची 05 एच.पी.ची 02 मोटार, व्हरुन कंपनीची 7.5 एचपीची मोटार, स्टार्टर असा एकुण 18,000₹ किंमतीच्या मोटारी या दि.23.02.2025 रोजी 18.30 ते दि. 24.02.2025 रोजी 10.30 वा. सु.शेत गट नं 42 मध्ये वडगाव ला शिवारा येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- रविकिरण गाढवे यांनी दि.25.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-मानिकचंद चंदुलाल बोराना, वय 76 वर्षे, रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांचे तेरखेडा येथील शेत गट नं 1226 मधील लोखंडी अँगल व लोखंडी जाळीचे कंपाउंड वॉल अंदाजे 125 फुट,03 सी.सी.अी.व्ही. कॅमेरे असा एकुण60,000₹ किंमतीचे साहित्य व 15 सीसीटीव्ही कॅमेराची तोडफोड व 18 लोखंडी पोल वाकवुन खली पाडून असे एकुण 1,80,000₹ किंमतीचे नुकसान करुन आरोपी नामे- शांतिलींग रंगनाथ कुंभार, प्रतिश शांमिलींग कुंभार, रमेश सिध्दलिंग कुंभार सर्व रा. तेरखेडा ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 23.02.2025 रोजी 22.30 वा. सु. चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- मानिकचंद बोराना यांनी दि.25.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2),324(4)(5), 3(5), 329(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे- तनवीर मुजावर व इतर 25 इसम यांनी दि. 25.02.2025 रोजी 15.30 वा. सु. बसस्थानक धाराशिव येथे फिर्यादी नामे-मंगेश रामरासराव काटे, वय 35 वर्षे, रा. समता नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांना व त्यांचे मित्र संदीप साळुंके, कुलदिप कदम यांना नमुद आरोपींनी फर्शी बसवण्याचे काम करत आहे तुम्ही येथुन जाउ नका असे म्हणून गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गज, काठी, दगडाने मारहाण करुन जखमी केले.फिर्यादी व त्यांचे मिश्र यांचे सोन्याचे दागिने काढून घेवून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मंगेश काटे यांनी दि.25.02.2025रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2),119(1), 352, 351(2),351(3), 189(2),190,191(2),191(3) सह कलम 135 मपोका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे- आबा शितोळे, साळुबाई शितोळे, रतनबाई रा. शिंगोली ता.जि. धाराशिव यांनी दि. 23.02.2025 रोजी 14.00 वा. सु. शिंगोली येथे फिर्यादी नामे-गोरख तात्याबा ओव्हाळ, वय 55 वर्षे, रा. शिंगोली ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी घरासमोरील वांगे व टोमॉटोचे झाड तोडण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, विट व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. फिर्यादीचे पत्नीस शिवीगाळ करुन काठीने विटाने मारहाण करुन जखमी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-गोरख ओव्हाळ यांनी दि.25.02.2025रोजी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),117(2), 115(2), 352, 351(2),351(3), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे- सुशांत बालाजी ढगे, विशाल बालाजी ढगे, अनिल ढगे, बालाजी ढगे, प्रथमेश बनसोडे, नितीन वाघमोडे, सर्व रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.24.02.2025 रोजी 22.30 वा. सु. सलुन दुकानासमोर काटी येथे फिर्यादी नामे-सुवर्णा तानाजी राउत, वय 35 वर्षे, रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे पती तानाजी राउत व मुलांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुवर्णा राउत यांनी दि.25.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1),296, 115(2), 352, 351(2),351(3), 189(1),189(2), 191(2), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तुळजापूर पोलीस ठाणे :आरोपी नामे- योगेश बाळासाहेब पाटील, विनोद बाळासाहेब पाटील, प्रविण विठ्ठल नागदे, सुशिल राम धनके, सर्व रा. सारोळा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.24.02.2025 रोजी 12.30 वा. सु. सारोळा येथे फिर्यादी नामे-शिवाजी शहाजी कांबळे, वय 30 वर्षे, रा. सारोळा (मा) ता. तुळजापूर जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी सरपंच व उपसरपंच यांचेवर अविश्वास ठरावावर सही करण्याचे कारणावरुन जातीवाचक शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉडने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शिवाजी कांबळे यांनी दि.25.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 115(2), 352, 351(2),351(3), 3(5) सह अ.जा.ज.अ.प्र. कायदा कलम 3(1)(आर)(एस) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • शिराढोण पोलीस ठाणे: आरोपी नामे- हनुमंत रामराव माने रा. आरणवाडी ता. धारुर जि. बीड व सोबत मयत नामे-हनुमंत असंबर उर्फ आसाराम उर्फ अशोक मायकर, वय 35 वर्षे, रा. जहागीर मोहा ता. धारुर जि. बीड हे दोघे दि.06.02.2025 रोजी 19.00 वा. सु. भाटशिरपुरा फाटा ढोकी ते कळंब जाणारा रोडवर मोटरसायकल क्र एमएच 44ए.ए.6016 वारुन जात होते. दरम्यान आरोपी नामे हनुमंत माने यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून पाठीमागे बसलेले हनुमंत मायकर हे मोटरसायकलवरुन खाली पडून अपघात होवून गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-किर्ती हनुमंत मायकर, वय 35 वर्षे, रा. जहागीर मोहा ता.धारुर जि. बीड यांनी दि.25.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ),125(ब), 106 सह कलम 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “जाळुन नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • ढोकी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-चरणसिंग विजयसिंग राजपुत, वय 28 वर्षे, रा. तेर ता. जि. धाराशिव यांनी दि.24.02.2025 रोजी 20.40 वा. सु. तेर शिवारातील शेत गट नं 410 मधील सहा एकर शेतातील हरभरा काढून लावून ठेवलेली गंज अज्ञात व्यक्तीने आग लावून अंदाजे 3,00,000₹ किंमतीचे जाळून नुकसान केले आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-चरणसिंग राजपुत यांनी दि.25.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 324े(5), 326(एफ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “अनैतिकदेह व्यापार करणा-या बार व लॉजवर छापा लॉज चालकावर गुन्हा नोंद.
  • कळंब पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)विजय परशुराम कदम, वय 47 वर्षे, रा. शिक्षक कॉलनी कळंब ता. कळंब जि. धाराशिव 2) प्रशांत विठ्ठल काळे, वय 44 वर्षे, रा. मंगरुळ ता. कळंब जि. धाराशिव, 3) सलाउद्दीन दगडु शेख, वय 38 वर्षे, रा. चोंदे गल्ली कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांनी संगणमत करुन स्वताच्या आर्थिक फायद्यासाठी दि.25.02.2025 रोजी 15.30 वा सु हिमालय बार व लॉज कळंब येथे चार महिलानां वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना ग्राहकांचे मागणी प्रमाणे लैंगीक समागमनाकरीता करीता पराववृत्त करुन त्यांना वैश्या व्यवसाय करण्यास भाग पाडून त्यांच्यावरती उपजिवीका करीत असताना मिळून आले. यावरुन पोलीसांनी छापा कारवाई करुन यातील पिडीत महिलांची सुटका करुन सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.न्या.सं. कलम 143, 144 सह अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध अधिनियम कलम 3, 4, 5 6 अन्वये कळंब पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!