कळंब – येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात प्रतीवर्षीप्रमाणे सांस्कृतिक विभाग आणि रासेयोच्या संयुक्त विद्यमाने रयतेच्या राज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांना ३९५ व्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ.अशोकराव मोहेकर (सचिव,ज्ञान प्रसारक मंडळ येरमाळा) उपस्थित होते. यावेळी संस्थेचे संचालक प्रा.डॉ.संजय कांबळे,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान,डॉ.के.डी.जाधव,प्रा. आप्पासाहेब मिटकरी, सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ. दीपक सूर्यवंशी,रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.पल्लवी उंदरे,डॉ.आर.व्ही.ताटीपामुल, तसेच प्रा.नामानंद साठे,प्रा.डॉ. मीनाक्षी जाधव,प्रा.मांडे,प्रा. विलास अडसूळ,प्रा.पाटील,प्रा. सूरज गपाट,प्रा.महेश मडके,प्रा.बोबडे,प्रा.खोसे, प्रा. खंडागळे,प्रा.जगदीश गवळी, नेताजी देशमुख,संतोष मोरे, विनोद खरात,उपस्थित होते. कार्यक्रमासाठी हनुमंत जाधव,ग्रंथपाल अनिल फाटक , संगीता रूमने,साजिद शेख, कमलाकर बंडगर,अर्जुन वाघमारे,इकबाल शेख,उमेश साळुंखे,संदीप सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
More Stories
प्रवेशोस्तवामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो – आ.विक्रम काळे
बहुजन समाज परिवर्तन क्रांतीत शिक्षकांचे योगदान महत्वाचे- ॲड.मंगेश ससाणे
अडथळ्याची शर्यत पार करतो तोच गुणवंत ठरतो – करियर मार्गदर्शक गणेश लोमटे