धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.14 फेब्रुवारी रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 258 कारवाया करुन 2,05,300 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे:आरोपी नामे-पांडुरंग हरी लाड, वय 35 वर्षे, रा.रुईभर ता. जि. धाराशिव हे दि.14.02.2025 रोजी 17.03 वा. सु. रुईभर येथे अंदाजे 14,370 ₹ किंमतीच्या 168 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. आरोपी नामे-करण गणेश गायकवाड, वय 28 वर्षे, रा.बौध्द नगर, धाराशिव ता.जि. धाराशिव हे दि.14.02.2025 रोजी 18.25 वा. सु. गोवर्धन झेंडे यांचे घरासमोर रोडवर अंदाजे 4,000 ₹किंमतीची 40 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
उमरगा पोलीस ठाणे:आरोपी नामे-सचीन गणपती कांबळे, वय 35 वर्षे, रा. नाईचाकुर ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.14.02.2025 रोजी 14.35 वा. सु. भिमनगर नाईचाकुर येथे अंदाजे 2,380 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 34 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
तामलवाडी पोलीस ठाणे:आरोपी नामे-राजेंद्र गुलाब जाधव, वय 32 वर्षे, रा. पांगरधरवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.14.02.2025 रोजी 18.00 वा. सु. हॉटेल विराज समोर अंदाजे 2,470 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 27 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
आनंदनगर पोलीस ठाणे:आरोपी नामे-मोबीन अब्दुलसत्तार शेख, वय 51 वर्षे, रा. खाजानगर धाराशिव ता. जि. धाराशिव, यांनी दि.14.02.2025 रोजी 13.00 वा. सु. आपल्या ताब्यातील रिक्षा क्र एमएच 25 बी 5464 हा कोर्टाचे गेट समोर डांबरी रोडवर सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ गोवंशीय मांस जवळ बाळगुन विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
तामलवाडी पोलीस ठाणे :आरोपी नामे-महमंद ईस्माईल कुरेशी, वय 72 वर्षे, रा. काटी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.14.02.2025 रोजी 11.15 वा. सु. काटी येथे आपल्या दुकानात गोवंशीय जनावरांचे संशयीत मांस 20 किलो अंदाजे 3,000₹ किंमतीचे जवळ बाळगलेला तामलवाडी पोलीसांना मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द महा. प्राणी संरक्षण अधिनियम कलम 5(अ), 9(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
शिराढोण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अमलक लिंबराज पवार, वय 55 वर्षे, रा.करंजकल्ला ता. कळंब जि. धाराशिव यांचे करंजकल्ला शेत शिवार गट नं 76/3 मधीलर विहीरीवरील ओसवाल कंपनीची 3 एचपी ची सोलारवर चालणारी पाणबुडी मोटार अंदाजे 50,000₹ व एक मार्को कंपनीची 3 एचपी लाईटवर चालणारी पाणबुडी अंदाजे 5,000₹ किंमतीची असा एकुण 55,000₹ किंमतीच्या दोन मोटर या दि. 11.02.2025 रोजी 18.00 ते दि. 12.02.2025 रोजी 10.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमलक पवार यांनी दि.14.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2),324(4) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
येरमाळा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-किरण सोमनाथ कसबे, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव व इतर चार यांनी दि.13.02.2025 रोजी 20.00 वा. सु. येरमाळा बार्शी रोडवरील रुमणे पेट्रोलपंपावर फिर्यादी नामे- तुषर अशोक रुमणे, वय 39 वर्षे, रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी पेट्रोल भरलेले पैशाचे ट्रानजेक्शन दाखवा असे बोलण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन जखमी केले. तुझा पेट्रोल पंप झाळुन व तुला जिवे ठार मारतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-तुषार रुमणे यांनी दि.14.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 189(2), 191(2), 115(2), 352, 351(2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
परंडा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे- प्रभाकर वामन बोराडे, प्रविण प्रभाकर बोराडे रा. दरेवाडी ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.14.02.2025 रोजी 07.00 वा. सु. दरेवाडी येथील शेत शिवारात फिर्यादी नामे- नागनाथ सोपान बोराडे, वय 63 वर्षे, रा. दरेवाडी ता. भुम जि. धाराशिव सामाईक बांधावरुन जाण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी,काठीने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारतो अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नागनाथ बोराडे यांनी दि.14.02.2025रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 118(1), 352, 351(2),3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
शिराढोण पोलीस ठाणे: मयत नामे-बालाजी मुरलीधर देवकते, वय 53 वर्षे, रा. तेर ता. जि. धाराशिव हे दि.08.02.2024 रोजी 15.00 ते 15.30 वा. सु. सुदर्शन माने यांचे घराजवळ मंगरुळ रोडवर मंगरुळ शिवारातुन मोटरसायकल क्र एमएच 13 बीएम 9096 ही वरुन जात होते. दरम्यान स्कॉर्पिओ क्र एमएच 04 जीडी 5270 चा चालकाने त्याचे ताब्यातील स्कॉर्पिओ ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून बालाजी देवकते यांचे मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात बालाजी देवकते हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-श्रीकांत महादेव मासाळ, वय 38 वर्षे, रा. बोर्डा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.14.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ), 125(ब), 106(1) सह कलम 134(अ)(ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
आंबी पोलीस ठाणे: मयत नामे-उर्मीला नागनाथ पौळ, वय 30 वर्षे, रा.डोंजा ता. परंडा जि. धाराशिव हे दि.13.02.2024 रोजी 15.30 वा. सु. घराजवळील बाथरुममध्ये होत्या. दरम्यान आरोपी नामे- कृष्णा संतोष चव्हाण रा. डोंजा ता. परंडा जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील महिंद्रा कंपनीचा अर्जुन ट्रॅक्टर हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून उर्मीला पौळ यांचे बाथरुमला धडक दिली. या अपघातात उर्मीला पौळ या गंभीर जखमी होवून मयत झाल्या. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-नागनाथ अभिमान पौळ, वय 38 वर्षे, रा. डोंजा ता. परंडा जि. धाराशिव यांनी दि.14.02.2025 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 106(1)सह 134 (अ)(ब), 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“तुळजापुरात विक्री करता येणारे एमडी ड्रग्स पकडले.
स्थानिक गुन्हे शाखा व तामलवाडी पोलीसांची संयुक्त कारवाई.”
मा. पोलीस अधीक्षक श्री संजय जाधव यांनी स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे तामलवाडी यांना अमली पदार्थ
विक्री करणारे इसमां वर कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक हे तुळजापूर उपविभागात गस्त करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, काही इसम अमली पदार्थ विक्रीकरिता तुळजापूर येथे आणणार अशी खात्री लायक बातमी मिळाल्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तात्काळ तामलवाडी पोलिसांची मदत घेऊन सोलापूर तुळजापूर महामार्गावर गस्त केली असता तामलवाडी टोल नाक्याच्या पुढे तुळजापूरच्या दिशेने एक मोटर कार संशयितरित्या थांबलेली दिसून आली तसेच कार मध्ये तीन इसम बसलेले दिसून आले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचे कडे एमडी हा अम्ली पदार्थअसल्याचे सांगितले. त्यांनी एमटी हा अमली पदार्थ मुंबईतून तुळजापुरात विक्रीकरिता आणल्याचे सांगितले. त्यावरून पोलिसांनी तात्काळ पंचनामा करून 59 पुड्या एमडी अमली पदार्थ किंमत 2,50,000₹ तसेच गुन्ह्यात वापरलेले वाहन व मोबाईल असा एकूण 10,75,000₹ किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. ताब्यात घेतलेले इसमांची नावे अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी दोघे राहणार तुळजापूर व संदीप संजय राठोड राहणार नळदुर्ग अशी असून सदर इसमांना पुढील कारवाई कामी पोलीस ठाणे तामलवाडी येथे जप्त मुद्देमालासह हजर करण्यात आले आहे. सपोनी कासार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील नमूद इस्मविरुद्ध एन डी पी एस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक श्री. संजय जाधव, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. गौहर हसन यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशा, धाराशिव चे सपोनि- श्री. सुदर्शन कासार, पोलीस ठाणे तामलवाडीचे सपोनि श्री. गोकुळ ठाकुर, पोउपनि लोंढे, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस हवालदार शौकत पठाण, प्रकाश औताडे, फहरान पठाण, जावेद काझी, चालक रत्नदिप डोंगरे, नितीन भोसले, तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार माने, सलगर, सुरनर, चौगुले, चालक
शेख यांच्या पथकाने केली आहे. (सोबत छायाचित्र जोडले आहे.)
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी