कळंब (शिवराज पौळ) – दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी डॉ. कोरे सहायक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग धाराशिव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाची जनजागृती करण्यासाठी स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत कळंब तालुक्यातील आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांचेसाठी तालुका क्रीडा संकुल कळंब येथे Run For Leprosy चे आयोजन करण्यात आले. यासाठी तालुक्यातील पुरुष व महिला यांचे दोन गटांमध्ये स्पर्धेचे आयोजन केले.महिला गटामध्ये प्रथम क्रमांक श्रीमती रेखा डाके, लाडकी बहिण व्दितीय क्रमांक बरडे अर्चना आशा कार्यकर्ती, तृतीय क्रमांक प्रज्ञा जाधव आशा पर्यवेक्षक व पुरुष गटामध्ये प्रथम क्रमांक आदेश ढगे डाटा आॉपरेटर,व्दितीय क्रमांक कृष्णा मोरे आरोग्य सेवक,तृतीय क्रमांक कृष्णा येंचलवार व मंगेश खरडकर यांना विभागून मिळाला.सदर स्पर्धेची सुरुवात डॉ.सय्यद तालुका आरोग्य अधिकारी व शेळके अवैद्यकिय पर्यवेक्षक यांनी हीरवा झेंडा दाखवून केली.स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून लक्ष्मण मोहीते क्रीडा शिक्षक कळंब यांचे मार्गदर्शन लाभले. स्पर्धेसाठी प्रमुख उपस्थिती डॉ.घोगरे वैद्यकीय अधिकारी धाराशिव, तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी बाबुराव जाधव पर्यवेक्षक तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय कळंब, आण्णा मुंढे अवैद्यकिय सहायक,कराड कुष्ठरोग तंत्रज्ञ व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.स्पर्धेचे प्रमाणपत्र ट्रॉफी व बक्षीस वितरण उद्या दिनांक 16/02/2025 रोजी डॉ. हरीदास जिल्हा आरोग्य अधिकारी धाराशिव यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात