August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”
  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि. 01 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 93 कारवाया करुन 57,600 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”
  • उमरगा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)आत्माराम उर्फ पिंटु पांडुरंग मुळगे, वय 40 वर्षे, रा. एकोंडी रोड आडत लाईनसमोर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.31.10.2023 रोजी 19.10 वा. सु. एकोंडी रोड उमरगा येथे आडत लाईनचे जवळ अंदाजे 3,990 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 34 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास आरोपी नामे 1)हिराबाई कल्याण पवार, वय 55 वर्षे, रा. इंदीरानगर भुम, ता. भुम जि. धाराशिव या दि.01.11.2023 रोजी 16.30 वा. सु. महावितरण सबस्टेशन भुमचे संरक्ष भिंतीलगत भुम येथे अंदाजे 16,500 ₹ किंमतीचे 200 लि. गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 5 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 2)अमोल उध्दव काळे, वय 40 वर्षे, रा. चोराखळी साखर कारखाना ता. कळंब जि. धाराशिव हे दि.01.11.2023 रोजी 14.45 वा. सु. धाराशिव कारखान्या समोरील बाजूस अंदाजे 21,000 ₹ किंमतीचे 200 लि. गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 50लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. तर 3)उत्तम रुपा राठोड, रा. जागजी तांडा ता. जि. धाराशिव हे दि.01.11.2023 रोजी 17.20 वा. सु. जागजी तांडा येथे आपल्या राहात्या घरा शेजारी अंदाजे 24,800 ₹ किंमतीचे 400 लि. गुळमिश्रीत रसायनिक द्रव व 10 लिटर गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये भुम, येरमाळा, ढोकी पो ठाणे येथे स्वतंत्र 3 गुन्हे नोंदविले आहेत.
  • अंबी पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)किरण विजयकुमार दैन, रा. शेळगाव, ता. परंडा जि. धाराशिव हे दि.01.11.2023 रोजी 17.30 वा. सु. ग्रामपंचायत कार्यालयाच्या शेजारी पत्रयाचे शेडच्या पाठीमागे अंदाजे 910 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 13 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये अंबी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान तामलवाडी पोलीसांनी दि.01.11.2023 रोजी 14.45 वा. सु. तामलवाडी पो. ठा. हद्दीत खडकी येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे 1)सुरज नरहरी शिंदे, वय 53 वर्षे, रा. खडकी, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे खडकी गावात कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 420 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • उमरगा पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- संजय दत्तात्रय शिंदे, वय 50 वर्षे, रा. मुळज ता. उमरगा जि. धाराशिव, यांचे मुळज शिवारातील शेत गट नं 151/5 मधील विहीरीवरील लक्ष्मी कंपनीची 05 एच. पी. ची. पानबुडी मोटर, स्टार्टर व 80 फुट केबल वायर असे एकुण 12,000 ₹ किंमतीचे साहित्या हे दि. 31.10.2023 रोजी 18.00 ते 23.00 वा. सु. अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी- संजय शिंदे यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-बालाजी सुभाष पवार, वय 46 वर्षे,रा. लिंबोनी बाग तांबरी विभाग महसुल कॉलनी धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 55,000₹ किंमतीची रॉयल इनफिल्ड कपंनीची बुलेट क्र एमएच 25 एजी 2277 इंजिन नं U3S5COGK145571 चेसी नं. ME3U3S5COGK1455571 ही दि. 27.10.2023 रोजी 11.00 ते दि. 28.10.2023 रोजी 04.00 वा. सु. रामनगर येथील हॉटेल सादिक धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बालाजी पवार यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • तामलवाडी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-बलवंत आण्णासाहेब करंडे, वय 28 वर्षे, रा. सावरगाव, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे अंदाजे 2,30,000 ₹ किंमतीचे ट्रॅक्टर क्र एमएच 25 एएल 7328 केसरी रंगाची सोबत ब्लोअर असलेला इंजिन नं 1KA0328 चेसी नं. KBTB30TNCMTC33256, मॉडल नं B- 2741 हा दि.29.10.2023 रोजी 19.00 ते दि. 30.10.2023 रोजी 06.00 वा. सु. बलवंत करंडे यांचे सावरगाव येथील शेतातील द्राक्ष बागेच्या शेजारी उभा केलेला ट्रॅक्टर अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- बलवंत करंडे यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे : दि. 25.10.2023 रोजी 12.30 ते दि. 31.10.2023 रोजी 10.00 वा. सु. उपजिल्हा रुग्णालय येथील नविन बांधकाम झालेले कॉर्टर मधील 38 कॉर्टरचे मेन वायरिंग 6 एमएम आरआर कंपनीचे वायर तसेच 07 कॉर्टर सर्व वायरिंग 06 एमसीबी बॉक्सची नविन वायरिंग असे एकुण 2,00,000₹ किंमतीचे वायर अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- प्रशांत गोविंद सुर्यवंशी, वय 25 वर्षे, रा. कोळसुर कल्याण, ता.उमरगा जि. धाराशिव यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे. सदर गुन्ह्याच्या तपासा दरम्यान उमरगा पोलीस ठाण्याचे पथकाने प्रशांत सुर्यवंशी यांनी पोलीस ठाणे नळदुर्ग येथे दिलेल्या माहिती वरुन पोलीस ठाणे नळदुर्ग यांनी लागलीच उपजिल्हा रुग्णालय कॉर्टर नळदुर्ग येथे जावून आरोपी नामे -1) गुरु राम पवार, 2) संजु सोमाजी पवार दोघे रा. विकाळी, ता. अक्कलकोट जि. सोलापुर यांना ताब्यात घेवून त्यांचे कडे सदर गुन्ह्या बाबत चौकशी केली असता नमुद आरोपीने सदर गुन्हा केल्याची कबुली दिली. यावर उमरगा पोलीसांनी नमुद आरोपी सह चोरीस गेलेला माल ताब्यात घेवून पुढील कार्यवाही करत आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : फिर्यादी नामे-संदीप सुनिल मोरे, वय 27 वर्षे, रा. गुरव गल्ली येडशी, ता. जि. धाराशिव यांचे अंदाजे 4,00,000 ₹ किंमतीचा पिकअप क्र एमएच 25 पी 3688 पांढरा रंगाचा सोबत हा दि.29.10.2023 रोजी 01.30 ते 05.30 वा. सु. जिजाउ चौकाजवळ येडशी येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- संदीप मोरे यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ लोकसेवकाने रीतसर जारी केलेल्या आदेशाची अवज्ञा करुन गैर निरोध करणे.”
  • उमरगा पोलीस ठाणे :1)आरोपी नामे-विनायकराव आनंदराव पाटील,2) विकास चंद्कांत पाटील, 3)नितीन आण्णाराव पाटील, 4)दिगंबर यादव सोनवणे, 5) विजयकुमार धोंडीराम सोनवणे, 6) जगन्नाथ नामदेव पाटील, 7)मुकुंद बाबुराव माने, 8) रमेश पांडुरंग माने, 9) भागवत धोंडीराम सोनवणे,10) सविता दिनकर मोरे, 11) अलका पांडुरंग माने, यांनी दि. 01.11.2023 रोजी 09.30 वा. सु. कवठा येथील लायन्स क्लब मंगल कार्यालयाचे प्रांगणात व राज्य रस्ता क्र एनएच 548 बी उमरगा ते लातुर रोडवर मा. जिल्हादंडाधिकारी साहेब यांचे आदेश क्र जा.क्र फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144(2) जा. क्र 2023 उपचिटणीस/एमएजी-3 सी.आर दि. 30.10.2023 अन्वयेचे उल्लंघन करुन उपोषण ठिकाणापासून राज्य सरकारच्या प्रतिकात्मक पुतळृयाचे अंतयात्रा काढून ति गावातील प्रमुख मार्गावरुन कवठा पाटीपर्यंत वाहतुक आडवून आंदोलन करुन राज्य सरकारच्या पुतळ्याचे दहन केले. यावरुन पोलीसांनी नमूद व्यक्तींविरुध्द भा.द.वि.स. कलम- 341, 143, 188 सह महाराष्ट पोलीस कायदा कलम 135 अन्वये उमरगा पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मारहाण.”
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)शिवाजी लक्ष्मण घोडके,2) सत्यभामा शिवाजी घोडके,3)लक्ष्मी निळकंठ घोडके, 4) लक्ष्मण निलाप्पा घोडके, 5) सुगलाबाई रामा गाडेकर, 6) वैष्णवी निलकंठ घोडके, 7)प्रतिक्षा निलकंठ घोडके, 8) ओंकार निलकंठ घोडके, 9) समर्थ निलकंठ घोडके, 10) निलकंठ लक्ष्मण घोडके सर्व रा. अणदुर, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.31.10.2023 रोजी 10.00 वा. सु. अणदुर शिवारतील शेतात फिर्यादी नामे- भरत विलास घोडके, वय 32 वर्षे, रा. अणदुर ता. तुळजापूर जि. धाराशिव शेतात बोर पाडण्याचे कारणावरुन नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी काठीने, दगडाने व चप्पलने मारहाण जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- भरत घोडके यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे- 1)समाधान अनंत शिंदे, 2)महेश बाळासाहेब शिंदे, 3)शुभम बाबासाहेब घुटे, 4)अजय बालाजी शिंदे सर्व रा. आरणी ता. जि. धाराशिव यांनी दि. 31.10.2023 रोजी 12.30 वा.सु. आरणी शिवारातील शेतात फिर्यादी नामे- शुभम किसन गरड, वय 28 वर्षे, रा. जागजी ता. जि. धाराशिव हे आप्पा पवार यांचे शेताकडे जात असताना त्यास नमुद आरोपींनी थांबवून आमचे गाडीला कट का मारला असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी दाताळाने मारहाण करुन जखमी केले. फिर्यादी यांचा विवो कंपनीचा मोबाईल दगडाने फोडून नुकसान केले. अशा मजकुराच्या फिर्यादी- शुभम गरड यांनी दि.01.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 427, 341, 324, 323, 504, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रस्ता अपघात.”
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : मयत नामे- अर्जुन रामहारी झिंजुरके, वय 52 वर्षे, सोबत 2) बशीर शमशेर खॉ शेख वय 75 दोघे रा. माजलगाव ता. माजलगाव जि. बीड हे दोघे दि.20.10.2023 रोजी 16.30 वा. सु. मोटरसायकल वरुन तुळजापूर ते माजलगाव जात होते. दरम्यान पिकअप क्श्र एमएच 23 एयु 0760 च्या चालकाने त्याचे ताब्यातील पिकअप ही हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून अर्जुन यांचे मोटरसायकलला धडक दिली. या आपघातात अर्जुन रामहारी झिंजुरके, बशीर शमशेर खॉ शेख हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. तसेच नमुद पिकअप चालक हा आपघाताची माहिती न देता वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी ज्ञानेश्वर रामहारी झिंजुरके, वय 54 वर्षे, रा. मठ गल्ली, माजलगाव ता. माजलगाव जि. बीड यांनी दि.0 1.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम134 (अ) (ब), 184अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!