कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने मुख्याध्यापक व्यंकट कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्याभवन हायस्कूल कळंब या प्रशालेत मराठी भाषा पंधरवड्या निमित्त निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेचा जास्तीत जास्त दैनंदिन व्यवहारात वापर व्हावा तसेच मराठी भाषेचे संवर्धन व्हावे.मराठी वाचन संस्कृती वाढवावी म्हणून निबंध लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.ही स्पर्धा दोन गटात घेण्यात आली होती.शालेय गट इयत्ता सहावी ते आठवी निबंध लेखनाचा विषय माझी मातृभाषा मराठी तसेच युवा गट इयत्ता नववी ते बारावी निबंध लेखनाचा विषय मराठी भाषा संवर्धन काळाची गरज या दोन्ही गटात निबंध लेखन स्पर्धा घेण्यात आली. शालेय गटात इयत्ता सहावी ते आठवी 88 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला व युवा गट इयत्ता नववी गटात 42 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. प्रशालीतील निबंध लेखन स्पर्धेत एकूण 130 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला होता.प्रशालेतील मराठी विभाग प्रमुख,नवोपक्रमशील शिक्षक सोपान पवार यांनी निबंध लेखनाविषयी वाचन संस्कृती विषयी मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी कथा, कादंबरी ,प्रवास वर्णन, चरित्र, आत्मचरित्र,संत वाड्मय साहित्याचे वाचन करावे, वाचनामुळे आपल्या ज्ञानात वाढ होते.विद्यार्थ्यांनी वाचन केल्याने विचारशक्ती ,कल्पकता आणि संवाद कौशल्य आत्मसात होतात .वाचनाने माणूस ज्ञानी बनतो. जीवनाला एक नवी दिशा मिळते. वाचनातून निबंध लेखन, कौशल्य आत्मसात करता येते. विविध विषयांवर सृजनशील विचारानी निबंध स्वतःच्या भाषेत लेखन करता येते.असे विचार व्यक्त केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात