कळंब – भाटशिरपुरा तालुका कळंब येथील गुलाब महेबुब शेख हे डाकपाल म्हणून संपूर्ण नोकरी तालुक्यातील भाटशिरपुरा व पिंपळगाव (डोळा) येथे केली. सेवानिवृत्त झाल्या नंतर कै. लोकनेते लिंबराज (आबा) गायकवाड यांची प्रेरणा घेऊन सामाजिक कार्यास सुरवात केली.ते जाती पातीच्या पुढे जाऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन जीवनात वाटचाल केली आहे.त्याच्या शिवभक्तीची दखल घेऊन कळंब तालुका पत्रकार संघाने,त्यांना शिवभूषण पुरस्कार पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्रातील नव्या युगाला प्रारंभ झाला आणि सामाजिक विचारांची ओळख खऱ्या अर्थाने मराठा सेवा संघाच्या माध्यमातून पुरुषोत्तम खेडेकर यांच्या “मराठा सेवा संघ” नावाच्या संघटनेच्या मराठा जोडो अभियान शिवश्री अतुल (भैय्या) गायकवाड यांच्या माध्यमातून कळंब व भाटशिरपूर येथे आगमन झाले,खेडेकर यांचे विचार एकूण शिव फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारावर वाट चाल चालू केली. मराठा सेवा संघ,संभाजी ब्रिगेडच्या जिल्ह्यातील बहुतांशी कार्यक्रमात सक्रीय सहभाग घेतला. भंडारकर प्रकरणी शिवद्रोही भंडारकर संस्थेवर धडक कारवाई केली त्या वेळी त्यांचे सुपुत्र रमजान शेख हे ही सहभागी होते. त्या वेळी त्यांच्या पत्नी सौ. लैलाबी गुलाब शेख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.त्यावेळी त्यांचा मुलगा हा येरवडा जेल मध्ये होते.त्या वेळी काही विघ्न संतोष्टी लोकांनी त्यांना या संघटनेच्या व पुरूषोत्तम खेडेकर यांच्या विरोधात तुमच्या मुलांना जाणीव पूर्वक घेऊन गेले त्या मुळे तुम्हच्या पत्नीचे निधन झाले,त्या कारणाने त्यांच्या वर गुन्हा दाखल करावा असेही सांगण्यात आले. परंतु गुलाब शेख हे डगमगले नाहीत व त्यांची भूमिका त्या वेळी फार महत्वाची होती.एक मुलगा जिजाऊ शिवराय यांच्या साठी कुर्बान झाला तरी मला त्याचा अभिमान आहे,वेळ पडली तर संघटनेचे गुन्हे मी माझ्या अंगावर घेईन असे हे शिवप्रेमी. आपल्या पत्नीच्या दफन विधी निमित आलेले हजारो जन समुदया समोर यांच्या उपस्थित त्यांनी जय जिजाऊ जय शिवराय यांच्या घोषणा देत आपल्या पत्नीला निरोप दिला.उपस्थित असलेल्या समुदायाच्या अंगावर अक्षरश शहारे आले होते. त्यावेळे पासून हे आपल्या दिवस भरामध्ये पाच तास हे महापुरुषांचे कार्य सांगत असतात.सर्वा सोबत एकोप्याने राहतात,गावातील सर्वाचे आवडते,मदतीला धावून जाणारे,असे गुलाब भाई.. आज पर्यंत दर वर्षी छत्रपती शिवाजी महाराज जयंती मध्ये धडाडीने शिवसेवक म्हणून शिवकार्य करत आहेत.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे