कळंब – शहरातील भिमाई महिला मंडळाच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि.७ फेब्रुवारी २०२५ वार शुक्रवार रोजी भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले.वाजतगाजत,ढोल-ताशांच्या गजरात काढलेल्या या मिरवणुकीत महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.
शहरातील क्रांती भूमी भीम नगर या ठिकाणी सकाळी ९ च्या दरम्यान शांतीचा संदेश देणारे भगवान तथागत गौतम बुद्ध,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य रॅलीस सुरुवात झाली. भीम नगर येथून सुरुवात झली ही रॅली पुढे डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,छत्रपती शिवाजी महाराज चौक,अहिल्याबाई होळकर चौकात पुष्पहार अर्पण करून डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास व माता रमाई यांच्या प्रतिमेस भिमाई महिलांच्या पदाधिकारींच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सामुदायिकरित्या त्रिशरण पंचशील,बुद्ध पूजा ग्रहण करण्यात आले.
माता रमाई यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षमय जीवनात मोलाची साथ दिली.त्यांच्या त्याग,सहनशीलता आणि कर्तृत्वामुळे सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला बळ मिळाले.त्यांच्या स्मृतींना वंदन करण्यासाठी ही मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीदरम्यान “माता रमाई आंबेडकरांचा विजय असो, “रमाईंच्या त्यागाला सलाम”, “समतेचा जागर,रमाई आमचा आधार” अशा घोषणा देण्यात आल्या.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी रमाई यांच्या विचारांचे स्मरण करून महिला सशक्तीकरण व सामाजिक न्यायासाठी त्यांच्या कार्याचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी भिमाई महिला मंडळाच्या सुनंदा सुनील गायकवाड,समीक्षा गायकवाड,विमल गायकवाड, आशाबाई वसंत गायकवाड, शितल श्याम गायकवाड,कलावती गायकवाड, जयवंतबाई गायकवाड,अनिता गायकवाड,सुलभा गायकवाड, छाया गायकवाड,संगीता गायकवाड,लोचनाबाई गायकवाड,कालींदा हौसलमल,रंदावणी हौसलमल, श्वेता गायकवाड,साक्षी गायकवाड,अनिता हौसलमल,लक्ष्मी ओव्हाळ, राजूबाई साळवे या सदस्यांनी विशेष मेहनत घेतली.
More Stories
ग्रामीण शिक्षणाचा प्रेरणास्त्रोत शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना अभिवादन
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे