September 24, 2026

“परिवर्तन राज्यस्तरीय आदर्श शिक्षक ” पुरस्काराने कमलाकर शेवाळे सन्मानित

  • कळंब – ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या प्रेरणेने प्राचार्य संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील मोहा येथील ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालयातील सहशिक्षक कमलाकर शेवाळे हे गेली २१ वर्षे इंग्रजी विषयाचे ज्ञानदानाचे कार्य करतात.तसेच लोक कल्याण बहुउद्देशीय सामाजिक संस्था शेळका धानोरा तथा नेहरू युवा मंडळ कळंब (सचिव)या संस्थेच्या माध्यमातून ते सतत सामाजिक कार्यात उस्फुर्त सहभाग घेत असतात.
    यामध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप,रक्तदान शिबिरामध्ये सक्रिय सहभाग, गरिब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत , अशी अनेक प्रकारचे सामाजिक कार्य त्यांच्या हातून घडत असते. याची दखल घेऊन नळदुर्ग येथील परिवर्तन सामाजिक संस्थेने घेऊन त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार दिनांक २ फेब्रुवारी २०२५ रोजी ”आपलं घर प्रकल्प आदिलाबाद ” नळदुर्ग येथे सभागृहात ज्येष्ठ समाजवादी नेते पन्नालाल ( भाऊ ) सुराणा यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.याप्रसंगी राजश्री शाहू महाविद्यालय लातूरचे माजी प्राचार्य तथा ज्येष्ठ विचारवंत डॉ.सुरेश वाघमारे,डॉ.मिलिंद वाकोडे सेवानिवृत्त कार्यकारी अधिकारी खादी ग्रामोद्योग भारत सरकार ,प्रा.राजा सोनकांबळे, एस.एन. डी.टी.महिला कॉलेज पुणे ,शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयाचे डॉ.ज्ञानोबा जाधव,माजी उपप्राचार्य ॲड.श्रीमती मैना भोसले सदस्य महाराष्ट्र राज्य बालकल्याण समिती धाराशिव , संयोजक मारुती बनसोडे,परिवर्तन सामाजिक संस्था नळदुर्ग ,शिक्षक भारती संघटनेचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ कानडे यांची उपस्थिती होती.
    या यशाबद्दल सचिव डॉ. अशोकराव ( दादा ) मोहेकर,संस्थेचे अध्यक्ष अनिल बापू मोहेकर ,संस्थेचे जेष्ठ संचालक तात्यासाहेब (आबा ) पाटील,प्रशालेचे प्राचार्य संजय जगताप,शालेय समितीचे अध्यक्ष बाबासाहेब (बप्पा )मडके , शालेय समितीचे सदस्य गौतम आप्पा मडके आदींनी त्यांचे अभिनंदन केले.
error: Content is protected !!