कळंब – ज्ञान प्रसारक मंडळ, येरमाळा या संस्थेच्या माध्यमातून संत नामदेवांच्या “ज्ञान दीप लावू जगी” या ब्रीदवाक्याचा अंगीकार करून मराठवाड्यात शिक्षणाचा प्रसार करण्याचा संकल्प कळंब तालुक्यातील मोहा येथील शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजींनी केला.सन १९५१ साली स्थापन झालेल्या या मंडळाच्या प्रयत्नांतून अनेक शाळा व महाविद्यालयांची स्थापना करण्यात आली. सर्वसामान्य व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी संस्थेने विविध शैक्षणिक उपक्रम हाती घेतले. प्रारंभी प्राथमिक व माध्यमिक शाळांची स्थापना करण्यात आली,त्यानंतर उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षणाच्या सुविधा पुरविल्या. संस्थेच्या प्रयत्नांमुळे हजारो विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आले असून,त्यातून अनेक यशस्वी व्यक्ती घडल्या आहेत. संस्थेच्या शाळा आणि महाविद्यालयांनी शैक्षणिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा पुढेही ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर हे आपल्या “ज्ञान दीप लावू जगी” या उद्दिष्टासह शिक्षणप्रसारासाठी कार्यरत राहणार असून त्यांच्याच प्रेरणेने दि.६ फेब्रुवारी २०२५ वार गुरुवार रोजी मराठवाड्यातील ज्ञान प्रसारक मंडळ,येरमाळा संचलित प्राथमिक,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात त्यागमय शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींना पुढील ठिकाणी अभिवादन करण्यात आले.
शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय,कळंब येथे प्रा.नितीन अंकुशराव यांच्या हस्ते गुरुजींच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी ज्ञान प्रसारक मंडळाचे कर्तव्यदक्ष सचिव डॉ.अशोकराव मोहेकर,प्राचार्य डॉ.सुनिल पवार,सा.साक्षी पावनज्योत उपसंपादक तथा उपप्राचार्य डॉ.कमलाकर जाधव,उपप्राचार्य अप्पाराव मिटकरी,ग्रंथपाल अनिल फाटक,उपसंपादक तथा सहा.ग्रंथपाल अरविंद शिंदे आदींची उपस्थिती होती.
विद्यामंदिर हायस्कूल आष्टा ता.भूम येथील कार्यालयात शि.म.ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या प्रतिमेस मुख्याध्यापक आनंद रामटेके यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सहाय्यक शिक्षक नामदेव अंनत्रे,शशिकांत मांजरे,संघपाल सोनकांबळे,सहशिक्षिका श्रीमती निर्मला वाघमारे,सुजीतकुमार जाधव,बबन यादव आदींची उपस्थिती होती.
विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिर, कळंब येथे मुख्याध्यापक सुभाष लाटे यांच्या हस्ते गुरुजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. याप्रसंगी सहाय्यक शिक्षक बारकुल,व्ही.एन.मोरे,दत्तात्रय वळेकर आदींची उपस्थिती होती.
ज्ञान प्रसार प्राथमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी (आण्णा) यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रशालेतील शेवाळे कमलाकर ,श्रीमती सोनवणे निता,श्रीमती पाटील स्मिता,जाधव पांडुरंग आदी उपस्थित होते.
संभाजी विद्यालय पिंपळगाव (लिंगी) ता.वाशी येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी ( आण्णा) यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक युवराज सावंत यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी प्रशालेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,येरमाळा येथिल कार्यालयात शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस प्राचार्य शिवाजी पौळ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.याप्रसंगी सर्व शिक्षक व शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.
ज्ञान प्रसार माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहा येथे शिक्षण महर्षी ज्ञानदेव (आण्णा) मोहेकर गुरूजींना प्राचार्य तथा मुख्याध्यापक संजय जगताप पाटील यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले.यावेळी संस्थेचे प्रशासकीय अधिकारी रमेश भाऊ मोहेकर,प्रा.शेखर गिरी, अमितकुमार शर्मा,बालाजी काळे,ज्ञानोबा टोपे आदींची उपस्थिती होती.
जय भवानी विद्यालय पारा या प्रशालेमध्ये कै.शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर गुरुजी यांच्या प्रतिमेस मुख्याध्यापक एन.बी.सुर्यवंशी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी सह शिक्षक भराटे एस. डी,श्रीमती मेटे एस.व्ही,वाघमारे एस.झेड,मुरकुटे डी.व्ही,बांगर ए. बी,मुळे डी.एस,सोलंकर एस.बी,अमोल गवळी,तुषार डंबरे आदी उपस्थित होते.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे
छत्रपती संभाजी विद्यालयात प्रवेश उत्सव उत्साहात साजरा