August 9, 2025

महाविद्यालयातील युवकांनी डिजिटल साक्षरता दूत व्हावे – तहसीलदार हेमंत ढोकले

  • डिकसळ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने मौजे डिकसळ या गावे सात दिवसीय राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न झाले. या शिबिराच्या समारोप प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून तहसीलदार हेमंत ढोकले हे मार्गदर्शन करताना म्हणाले की, “ आजच्या काळात युवक सक्रियपणे डिजिटल साक्षरता काळाची गरज आहे.सर्वच क्षेत्रात अत्याधुनिक संगणक युगात नवी प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरत आहे.आजचा काळ गतिमान आहे,अनेकदा मोबाईलवर एसएमएस,ओटीपीच्या माध्यमातून ऑनलाईन सायबर स्कॅम मोठ्याप्रमाणात घडत आहे,त्यांच्या कष्टाची रक्कमेचे खाते रिकामे होत आहे,भयानक अशा परिस्थितीत विशेषतः ग्रामीण भागातील शेतकरी,ज्यांना अजूनही याबाबत सखोल माहिती नाही”, अशा समाजाचे साक्षरता दूत म्हणून कार्य करण्याची गरज आहे.
    या समारोप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी म्हणून प्राचार्य डॉ.सुनिल पवार यांनी उपस्थित होते,त्यांनीही उपस्थिताना मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातून आपले कला कौशल्य सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ मिळते.अशा कार्यक्रमातून व्यासपीठाचा स्वयंसेवकांनी लाभ घ्यावा असे मत मांडले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.पल्लवी उंदरे यांनी केले.तसेच या शिबिरातील उपक्रमाचा अहवाल रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. आर.व्ही.ताटीपामुल यांनी सादर केला. या शिबिराच्या नियोजन प्रा.डॉ. संदीप महाजन यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार उपप्राचार्य डॉ.कमलाकर जाधव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.डॉ. हेमंत भगवान, प्रा.डॉ.दत्ता साकोळे, प्रा. डॉ. ज्ञानेश चिंते, प्रा.डॉ. दादाराव गुंडरे सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी ,प्रा.डॉ.नागनाथ आदाटे, प्रा.डॉ. श्रीकांत भोसले,प्रा.डॉ. विश्वजीत मस्के, प्रा.अर्चना मुखेडकर प्रा.डॉ.मीनाक्षी जाधव,प्रा.सुशील जमाले, प्रा.डॉ. बालाजी वाघमारे प्रा.मारुती शिंपले,सहाय्यक ग्रंथपाल अरविंद शिंदे ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव,अर्जुन वाघमारे, कमलाकर बंडगर यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!