डिकसळ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ व शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित डिकसळ येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराच्या पाचव्या दिवशी विविध कार्यक्रम राबविले गेले.यामध्ये सुरुवातीस शाळेच्या परिसरापासून ग्राम स्वच्छता अभियानाला सुरुवात केली. तसेच गावामध्ये वृक्षारोपणाचा कार्यक्रमांतर्गत झाडे लावली. आजच्या बौद्धिक वर्गात लेफ्टनंट डॉ.पावडे यांचे शोष खड्ड्याचे फायदे याविषयी व्याख्यान आयोजित केले होते.याप्रसंगी आपले मत मांडताना लेफ्टनंट डॉ.पावडे यांनी भूजल पुनर्भरण व ग्राम स्वच्छतेसाठी शोष खड्ड्याची गरज ओळखून गावात शोष खड्ड्याचे प्रात्यक्षिक करून ग्रामस्थांना व राष्ट्रीय सेवा योजना विभागातील स्वयंसेवकांना त्याचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.पल्लवी उंदरे यांनी केले. तर अध्यक्ष समारोप प्रा.नितीन अंकुशराव यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रा. डॉ.संदीप महाजन यांनी मानले. या कार्यक्रमासाठी रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. राघवेंद्र ताटीपामूल, प्रा.डॉ. बालाजी वाघमारे प्रा.मारुती शिंपले,ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे अधीक्षक हनुमंत जाधव,अर्जुन वाघमारे, कमलाकर बंडगर यांनी परिश्रम घेतले.
More Stories
“आरक्षणावर उपवर्गीकरणाचा घाव चालणार नाही” कळंबमध्ये ४ मे रोजी भव्य मोर्चाची हाक
भोसा गावातील विद्यार्थ्यांची एस.टी.बससाठी हाक; शिक्षणासाठी प्रवासाचा मोठा प्रश्न ऐरणीवर
समता,शिक्षण आणि न्यायाचा दीप प्रज्वलित – मोहेकर महाविद्यालयात महात्मा ज्योतिबा फुले जयंती उत्साहात साजरी