कळंब- नुकत्याच झालेल्या केज तालुक्यातील जनविकास महाविद्यालय,बनसारोळा येथील पूज्य मनोहरराव गोरे आंतरमहाविद्यालयीन मराठवाडास्तरीय वाद-विवाद स्पर्धेत – सद्य स्थितीतील शासकीय योजनामुळे महिलांचे सक्षमीकरण होईल,होणार नाही ” या विषयावर आयोजित स्पर्धेत तृतीय क्रमांक (२१०० आणि स्मृतीचिन्ह ) पटकावलेल्या आकाश सतीश बारसकर आणि अनिल नाना वाघमोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ज्ञानप्रसारक मंडळ येरमाळा संस्थेचे सचिव डॉ.अशोकराव मोहेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.यावेळी संचालक डॉ.संजय कांबळे,प्राचार्य डॉ. सुनिल पवार,उपप्राचार्य डॉ.हेमंत भगवान, प्रा.डॉ.कमलाकर जाधव, प्रा.डॉ.दादाराव गुंडरे, डॉ. एम.बी.जाधव,शैलजा बरुरे, सोपान पवार,सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.डॉ.दीपक सूर्यवंशी यांनी वादविवाद स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तर अधीक्षक हनुमंत जाधव,अरविंद शिंदे,संदीप सूर्यवंशी यांनी सहकार्य केले. यावेळी प्राध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने होते.
More Stories
कळंब खरेदी-विक्री संघाची निवडणूक जाहीर;१८ एप्रिलला मतदान
गुढीपाडवा उपक्रमातून शिक्षणाची नवी सुरुवात;चिमुकल्यांनी भरली शाळा
भिमा हगारे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस तालुकाध्यक्षपदी निवड