लातूर (संघपाल सोनकांबळे) – श्रावस्ती बुध्द विहारात दि.१ जाने २०२५ रोजी भिमाकोरेगावं शौर्य दिन व नूतन वर्षारंभ धम्मोस्तव साजरा. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देविदासबाबा आचार्य,प्रमुख पाहुणे मेजर वसंतराव कांबळे,कुसुम बानाटे,महिला मंडळ अध्यक्षा यांच्या मंगल हस्ते बुध्द भीमाच्या पुतळ्यांना धूप दीप पुष्पाने वंदन करून भीमा कोरेगाव शौर्य स्तंभ प्रतीकृतिला पुष्पहार,पुष्पचक्र वाहून धम्मध्वज पाहुणे मेजर वसंतराव कांबळेनी फडकला.मग सर्वांनी धम्मध्वजाला,शौर्य स्तंभाला मानवंदना दिली.ज्योती घारगावकरच्या नेतृत्त्वात बुद्धवंदना घेऊन,धम्म ग्रंथ वाचन झाले.यानंतर प्रा.विलास घारगावकरानी भिमाकोरेगावचा, शूरवीर शहीद नागवंशीय महारांचा पराक्रमी,क्रांतिकारी इतिहास आपल्या भाषणातून सांगितला.यावेळी ते म्हणाले की, नागवंशीय महारांचे शौर्य हृदयात ठेऊन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला धम्म जगुयात व प्रबुद्ध होऊन भारताची लोकशाही समृद्ध करूयात.आणि भारतीय संविधान,भारतीयांचा सन्मान जपण्यासाठी आपले नागवंशीय शौर्य कामी आणुयात.आपले नि आपल्या समाजाचेही रक्षण करूयात. सर्वांना न्याय नितीने,शील सदाचारी वृत्तीने चराचराचे मंगल करत असलेल्या धम्म पथावरून घेऊन जात आपल्या भारत देशाला जगताचा मार्गदाता विश्वगुरु बनविण्याकामी आपले तन मन धन कामी लाऊयात.हाच नवीन वर्षाचा संकल्प करूयात. यासाठीच पूर्वीच्या महारांनी म्हणजे आत्ताच्या बौद्धांनी बहुजनांचे नेतृत्व करत राजकर्ती जमात बनुयात.५६ लोकांना एकाएकाने आडवे केले तो ईतिहास जगुन लाच्यारीचे जिने सोडुन समृध्द होऊयात. यासाठी इतिहास जगुयात.नियमित बुध्द विहारी येऊयात.समाजात हरवत चाललेला सुसंवाद वृद्धिंगत मंगलमैत्रिणे करुयात.यातच आपले सौख्य सामावलेले आहे. यानंतर धम्मपालन गाथेनी सांगता करत.नववर्षानिमित्त मिठाई वाटून आनंद साजरा केला.यावेळी विष्णु क्षिरसागर, बीटी सूर्यवंशी,प्रभाकर करवंजे,दिगंबर कांबळे, विजयमाला सरवदे,मंगल धायगुडे,प्रतिभा सावळे,सुशीला डोनेराव,विजया करवंजे,संजीवनी गडेराव, अनुसया कांबळे सह अनेक नागरिक उपस्थित होते.
More Stories
“धाडस,विचार आणि सेवा यांचा संगम – पँथर अशोक कसबे” (वाढदिवस विशेष लेख)
वृद्ध शेतकऱ्याला न्याय दिल्यामुळे उपविभागीय अधिकारी निलंगा यांचे फेसकॉम तर्फे सत्कार
अधिकारी व्हायचे असेल तर जि.प शाळेतच प्रवेश घ्या – उपशिक्षणाधिकारी दत्तात्रय लांडगे