धाराशिव (जिमाका) – नाताळ व नववर्षानिमित्ताने विदेशी मद्य किरकोळ विक्रीची,बियर विक्रीची,परवाना कक्ष,क्लब परवाना असलेली तसेच मद्य विक्रीची दुकाने २४ डिसेंबर,२५ डिसेंबर आणि ३१ डिसेंबर २०२४ रोजी निर्धारित वेळेनंतर रात्री १०.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत तर काही दुकाने पहाटे ५ वाजेपर्यंत उघडे ठेवण्यास जिल्हाधिकारी डॉ.मैनक घोष यांनी एका आदेशद्वारे मान्यता दिली आहे. यामध्ये एफएल -२ (विदेशी मद्य किरकोळ विक्रीचे दुकान), एफएलबीआर -२ (बंद बाटलीतून बीअर विक्री) दुकाने रात्री १०:३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत तर एफएल -३ (परवाना कक्ष) असलेली मद्यविक्रीची दुकाने आणि एफएल -४ (क्लब परवाना असलेली मध्यविक्रीची दुकाने) रात्री ११.३० ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजेपर्यंत आणि सीएल -३ प्रकारातील मद्यविक्रीची परवाना दुकाने अ व ब वर्गाच्या नगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत व इतर ठिकाणी रात्री १० ते दुसऱ्या दिवशी पहाटे १ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे.
More Stories
युद्धाचे पडसाद : सामान्य शेतकरी माणसाच्या आयुष्यातील बदल
धाराशिव जिल्हा परिषदेत अध्यक्ष अर्चनाताई पाटील यांचा गौरवपूर्ण सत्कार
लाडकी बहीण योजनेस गती; अंगणवाडी सेविकांचेही सक्रिय सहकार्य