August 9, 2025

शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

  • कळंब – कळंब तालुक्यातील गौरगाव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल प्रज्ञा प्रकाश पाटोळे (निलंगा नगर परिषद पाणीपुरवठा अभियंता),गौरी कमलाकर कापसे यांची (एम.बी.बी.एस नाशिक),अक्षय लहु माने सहाय्यक अभियंता जलसंपदा (लातूर),निरंजन बाबासाहेब पाटोळे कॅनल इंस्पेक्टर (लातूर),चक्रधर सुहास कापसे एच आर असिस्टंट (पुणे), कृष्णकांत राजेंद्र कापसे (सीआर पी एफ),शुभम जराचंद कापसे (सीआर पी एफ) आदींची शासकीय सेवेत नियुक्ती झाल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालयाच्या व ग्रामस्थांच्या वतीने दि.२३ डिसेंबर २०२४ रोजी सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी गावचे सरपंच सचिन कापसे,उपसरपंच काकासाहेब पाटोळे,विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी चेअरमन मधुकर कापसे, गुणवंत सपकाळ, विकास कापसे, मुख्याध्यापक ढोले, सहशिक्षक गवळी, गोरे, घाडगे,ताकपिरे,सतीश कापसे, अंकुश कापसे,पांडुरंग पाटोळे, लालासाहेब पाटोळे,सर्व ग्रा.पं.सदस्य पंडित पाटोळे, महेश कापसे,कांताबाई पाटोळे, नंदुबाई कांबळे,जनार्दन पाटोळे, योगीता कापसे,शालेय कमिटी अध्यक्ष कमलेश कदम यांच्या सह ग्रामस्थ व शिक्षक यावेळी उपस्थित होते.
    कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गवळी यांनी तर आभार ग्रामसेवक पोटे यांनी मानले.
error: Content is protected !!