कळंब – तालुक्यातील भाटशिरपुरा येथील कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयाचा माजी विद्यार्थी शुभम जमदाडे यांची सी.आर. पी.एफ मध्ये निवड झाली आहे.या निवडीबद्दल कै.भाई नारायणराव लोमटे माध्यमिक विद्यालयात शाळेच्या वतीने शाल,श्रीफळ व बुके देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुरेश टेकाळे हे होते. यावेळी सत्कारास उत्तर देतानी शुभम जमदाडे म्हणाले की,सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम करावे कारण की कठोर परिश्रमाशिवाय कोणत्याच क्षेत्रात यश प्राप्त होत नाही.सध्याच्या काळ खूप स्पर्धेचा असल्यामुळे विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच आपआपल्या प्रगतीचे नियोजन करावे आणि महत्वाचे म्हणजे इथल्या सर्व शिक्षकांच्या संस्कारामुळेच मी घडलो आहे. यावेळी कार्यक्रमास शुभम जमदाडे यांची आई पुष्पा जमदाडे,शाळेतील शिक्षक एस.जी.सूर्यवंशी,एस.एस.डिकले,बी.व्ही.ओव्हाळ, एच.ए.पानढवळे यांच्यासह शिक्षकेत्तर कर्मचारी व्ही.एस.चाळक उपस्थित होते. याप्रसंगी शाळेतील सर्व शिक्षकांनी शुभम जमदाडे यास भावी जीवनासाठी शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून एस.जी.सूर्यवंशी यांनी आभार मानले.
More Stories
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन
भीमराव दादा सत्यवचनी व्यक्तिमत्व होतं – डॉ. माणिक डिकले