August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

* “मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई.”

धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि. 27 ऑक्टोबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 91 कारवाया करुन 66,650 ₹‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.

* “ अवैध मद्य विरोधी कारवाई .”

लोहारा पोठाच्या पथकास आरोपी नामे 1)शाहुराज विश्वनाथ सोनवणे, वय 73 वर्षे, रा. नागुर, ता. लोहारा जि. धाराशिव हे दि.27.10.2023 रोजी 19.05 वा. सु.आपल्या राहात्या पत्रयाचे शेड समोर नागुर येथे अंदाजे 1,680 ₹ किंमतीच्या 21 देशी विदेशी दारुच्या सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये लोहारा पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.

*“ जुगार विरोधी कारवाई.”

धाराशिव शहर पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.27.10.2023 रोजी 13.00 ते 16.40 वा. सु. धाराशिव शहर पो. ठा. हद्दीत 7 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)राहुल जालींदर जाधव, वय 29 वर्षे, रा. इंगळे गल्ली, धाराशिव ता. जि. धाराशिव हे देशपांडे स्टॅन्ड जवळ स्वराज हॉटेल समोर कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 730 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 2)बबन गोरोबा तट, वय 34 वर्षे, रा. तुळजापूर नाका, धाराशिव धाराशिव ता. जि. धाराशिव हे साठे चौक ते तुळजापूर जाणारे रोडलगत कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 550 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 3)नागेश साहेबराव शहापालक, वय 40 वर्षे, रा. भोसले हायस्कुल समोर तांबरी विभाग, धाराशिव ता. जि. धाराशिव हे राजेंद्र काहे यांच्या घरासमोर भोसले हायस्कुल समोर तांबरी विभाग धाराशिव शहर येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,450 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 4)महेश माणिक पेठे, वय 45 वर्षे, रा. फकिरा नगर, धाराशिव ता. जि. धाराशिव हे धाराशिव शहरातील खडकपुरा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,205 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 5)राजु आमरनाथ पारसे, वय 31 वर्षे, रा. झोरे गल्ली, धाराशिव ता. जि. धाराशिव हे देशपांडे स्टॅन्ड जवळ भाजी मार्केट धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 810₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 6)मैनु मदार तांबोळी, वय 36 वर्षे, रा. नागनाथ रोड रसुलपुरा, धाराशिव ता. जि. धाराशिव हे ताजमहल टॉकीज समोर काळ्या मारुती चौक जिवन टी. हाउस समोर मिलन डे जुगाराचे साहित्यासह एकुण 650 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 7)समीर मियॉ शेख, वय 34 वर्षे, रा. सांजावेस गल्ली, धाराशिव ता. जि. धाराशिव हे आठवडी बाजार कडे जाणारे रस्त्यावर नगरपरीषद गाळ्या समोर धाराशिव येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 570 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 7 गुन्हे नोंदवले आहेत.

*उमरगा पोलीस ठाणे: जुगार विरोधी कारवाई दरम्यान उमरगा पोलीसांनी दि.27.10.2023 रोजी 16.30 ते 18.15 वा. सु. उमरगा पो. ठा. हद्दीत 4 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे 1)शरण बसप्पा सुर्यकांत, वय 45 वर्षे, रा. देवीनगर आळंद रोड गलबर्गा ता. जि. गुलबर्गा ह.मु. कार्ले बिल्डींग उमरगा ता उमरगा जि. धाराशिव हे कन्हैया कपड्याचे दुकानाच्या समोर उमरगा येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,120 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 2)पांडुरंग हनुमंत सगर, वय 32 वर्षे, रा. कोराळ ता. उमरगा ह.मु. गुंजोटी ता. उमरगा जि. धाराशिव हे संभाजी सगर यांचे राहते घरासमोर बोळात गुंजोटी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,340 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 3)विजय कमलाकर वाघमारे वय 34 वर्षे, रा. तुरोरी ता उमरगा जि. धाराशिव हे तुरोरी ते आष्टा जा. रोडचे बाजूला तुरोरी येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 3,960 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. 4)संजय बाबु जाधव, वय 45 वर्षे, रा. बलसुर ता. उमरगा जि. धाराशिव हे बलसुर येथील चांदणी चौकात सचिन बिराजदार यांचे हॉटेल जवळ कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 1,090 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये उमरगा पो ठाणे येथे स्वतंत्र 4 गुन्हे नोंदवले आहेत.

* “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
भुम पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- संदीप विठ्ठल सुतार, वय 39 वर्षे, रा. शासकिय विश्रामगृह शेजारी पारडी रोड ता. भुम जि. धाराशिव, यांची 1,00,000₹ किंमतीची सेव्हरलेट बीट कंपनीची सिलव्हर रंगाची डीलेज कार
ही दि. 24.10.2023 रोजी 01.30 ते 03.00 वा. सु पारडी ते अहमदनगर जाणारे राजृय महामार्ग क्र 57 वर शासकिय विश्रामगृह शेजारी फिर्यादीचे घरा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- संदीप सुतार यांनी दि.27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

तुळजापूर पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- रत्नदिप नानासाहेब अमृतराव, वय 33 वर्षे, रा. खडकाळ गल्ली शुक्रवार पेठ तुळजापूर जि. धाराशिव, यांची 50,000₹ किंमतीची सी.बी. युनीकॉर्न कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एक्यु 1988 ही दि. 25.10.2023 रोजी 02.00 ते 06.00 वा. सु फिर्यादीचे बायपास रोड जवळील उड्डाण पुलाजवळील शेतातील शेड समोर तुळजापूर येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- रत्नदिप अमृतराव यांनी दि.27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

* धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- महेश बाळासाहेब जाधव, वय 29 वर्षे, रा. बावी ता. जि.. धाराशिव, यांची 20,000₹ किंमतीची हिरो कंपनीची काळ्या रंगाची स्पेलंन्डर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 ए.जी. 8045 ही दि. 26.10.2023 रोजी 10.00 ते दि. 27.10.2023 रोजी 06.30 वा. सु बावी येथील फिर्यादीचे चुलत भाउ अरुण जाधव यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- महेश जाधव यांनी दि.27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

आंबी पोलीस ठाणे : फिर्यादी नामे- विलास गहिनीनाथ ठाकरे, वय 42 वर्षे, रा. देवगाव बु. ता. परंडा जि. धाराशिव, यांची 30,000₹ किंमतीची काळ्या रंगाची स्पेलंन्डर प्लस मोटरसायकल क्र एमएच 25 ए.यु. 1373 ही दि. 26.10.2023 रोजी 23.00 ते दि. 27.10.2023 रोजी 06.00 वा. सु विलास ठाकरे यांचे राहाते घरा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- विलास ठाकरे यांनी दि.27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आंबी पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

*“ आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हा दाखल.”

लोहारा पोलीस ठाणे : मयत नामे- लिंबराज बाबुराव मुळे, वय 42 वर्षे, रा. नारंगवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.27.10.2023 रोजी 12.52 वा. पुर्वी पेठसांगावी शिवारातील रोहन बालाजी शिंदे यांचे शेत गट नं 78/03 मध्ये पळसाचे झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- 1) भारत शिक्षण संस्थेचे संचालक- शेषेराव नृसिंह पवार, 2)जयराम विद्यालय नारंगवाडी येथील मुख्याध्यापक- अजय शेषेराव पवार, दोघे रा. नारंगवाडी, ता. उमरगा जि. धाराशिव 3) भारत विद्यालय माकणी येथील मुख्याध्यापक-राम महादेव जाधव,रा. एकुरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी मयत लिंबराज मुळे हे भारत शिक्षण संस्था संचलित भारत विद्यालय माकणी येथे मागील एक वर्षापासून क्लार्क म्हाणून कार्यरत होते. नमुद आरोपींतानी तुम्हाला कारकुनचे कामकाज येत नाही तुम्ही पन्नास हजार रुपये घेवुन या तरच हजेरी पटावर स्वाक्षरी घेण्यात येईल असे म्हणून जाणून बुजून मानसिक त्रास दिल्याने त्यांचे जाचास व त्रासास कंटाळून लिंबराज मुळे यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या मयताचा चुलत भाउ यशवंत वसंतराव मुळे, वय 35 वर्षे, रा. उमरगा, ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन लोहारा पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम- 306, 384, 34 अन्वये गुन्हा नोंदवला आहे

* “ रस्ता अपघात.”

धाराशिव शहर पोलीस ठाणे :मयत नामे-रमेश अर्जुन जाधव, वय 45 वर्षे, रा. वडगाव सिध्देश्वर ता.जि. धाराशिव हे दि. 19.10.2023 रोजी 12.30 वा. सु. धाराशिव ते सोलापूर जाणारे एन.एच. 52 हायवे रोडवर धाराशिव शहर येथे उड्डान पुलावरून रोडच्या पलीकडे पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे हायगई व निष्काळजी पणे अतीवेगाने चालवून रमेश जाधव यांना पाठीमागून धडक दिली. या आपघातात रमेश जाधव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद अज्ञात वाहन चालक हा अपघाताची माहिती न देता अपघात स्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या फिर्यादी सुशिल अर्जुन जाधव, वय 21 वर्षे रा. वडगाव सिध्देश्वर ता. जि. धाराशिव यांनी दि.27.10.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) सह मो. वा. कायदा कलम 184, 134 (अ) (ब) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

error: Content is protected !!