August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलीसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.12 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 247 कारवाया करुन 1,91,850 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ जुगार विरोधी कारवाई.”
  • वाशी पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान वाशी पोलीसांनी दि.12.12.2024 रोजी 16.45 वा. सु.वाशी पो ठाणे हद्दीत मांडवा बसस्थानक येथे छापा टाकला. यावेळी आरोपी नामे-प्रशांत प्रभाकर गायकवाड, वय 24 वर्षे, रा.वाशी ता. वाशी जि. धाराशिव हे 16.45 वा. सु. मांडवा बसस्थानक येथे कल्याण मटका जुगाराचे साहित्यासह एकुण 730 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले वाशी पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये वाशी पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभी करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
  • मुरुम पोलीस ठाणे :सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायक रित्या वाहने उभे करणाऱ्या चालकांवर मुरुम पो.ठा.च्या पथकाने काल दि.12.12.2024 रोजी 11.45 ते 12.05 वा.सु. आरोपी नामे- सचिन शंकर थोरात, वय 24 वर्षे, रा. धानुरी ता. लोहारा जि. धाराशिव यांनी 11.45 वा. सु. आष्टामोड येथे जवळी जाणारे रोडवर ॲटो रिक्षा क्र एम.एच. 25 एम 1137 हा सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायक रित्या उभे करुन भा.दं.सं.कलम-285 चे उल्लंघन केले. आरोपी नामे-जिवन कालीदास जाधव, वय 38 वर्षे, रा. आष्टा जे. ता. उमरगा जि. धाराशिव यांनी 12.05 वा. सु. आष्टा मोड येथे जेवळी रोडवर ॲटो रिक्षा क्र एम.एच. 25 एन 0960 हा सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायक रित्या उभे करुन भा.दं.सं.कलम-285 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द मुरुम पो.ठा.येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • लोहारा पोलीस ठाणे : आरोपी नामे-साजिद आमीर खुटेपड, वय 30 वर्षे, रा. लोहारा, आमिन कुरेशी, रा. लोहारा ता. लोहारा जि. धाराशिव यांनी दि.12.12.2024 रोजी 20.00 वा. सु. माकणी येथे सरस्वती विद्यालयाचे समोर पिकअप क्र एमएच 43 बी.बी. 1695 मध्ये 4 जर्शी गायी वाहनासह अंदाजे 5,00,000₹ किंमतीच्या वाहना मध्ये दाटीवाटीने बांधून निर्दयतेने वागणुक देवून त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता जनावरांचे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करत असताना लोहारा पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तींविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) (ड), 11 (1) (ई), 11(1) (एच), सह 119 म.पो.का. सह भा.न्या सं कलम 49 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अतुलकुमार सुर्यकांत अलकुंटे, वय 42 वर्षे,रा. डी.आय. रोड समता नगर धाराशिव ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो स्प्लेंडर प्लस कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल क्र एमएच 25 एस 5850 ही दि.03.11.2024 रोजी 01.12 वा. सु. अतुलकुमार अलकुंटे यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अतुलकुमार अलकुंटे यांनी दि.12.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303 ( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • आनंदनगर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सत्यविजय शिवाजी मोहिते, वय 35 वर्षे, रा.सांजा ता. जि. धाराशिव यांची अंदाजे 15,000₹ किंमतीची होंडा ॲक्टीवा स्कुटी क्र एमएच 13 सी.सी. 1856 ही दि. 08.12.2024 रोजी 01.30 वा. सु. बसस्थानक धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सत्यविजय मोहिते यांनी दि.12.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 303( 2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • शिराढोण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-शरद पांडुरंग रितापुरे, वय 35 वर्षे, रा. भाटशिरपुरा ता. कळंब जि. धाराशिव यांचे भाटशिरपुरा शिवारातील शेतात गट नं 669 येथे उसतोड मजुर- नंदाबाई रमेश राठोड, रा. मोजमाबाद तांडा ता. पालम यांचे दोन ग्रॅमचे सोन्याचे फुले, चांदीचे जोडवे व रोख रक्कम 15,000₹, तर गयाबाई राठोड यांचे रोख रक्कम 3,500₹ व सविता बाळू चव्हाण यांची रोख रक्कम 4,500₹ असा एकुण 38,700 ₹ किंमतीचा माल शरद रितापुरे यांचे शेतातुन आरोपी नामे- शुभम दादाराव पाटील, रा. भाटशिरपुरा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.12.12.2024 रोजी 14.30 वा. सु. चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद रितापुरे यांनी दि.12.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन शिराढोण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ लैंगीक अत्याचार.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे :एका गावातील एक 16 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि.29.09.2024 रोजी 11.00 ते दि. 09.12.2024 रोजी 12.30 वा. सु. हिस एका गावातील एका तरुणाने तिचा पाठलाग करुन तिस सोलापूर येथील लॉजवर घेवून जावून तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. व माझेशी लग्न कर माझेशी लग्न केले नाही तर तुझे व्हीडीओ व्हायरल करुन बदनामी करेन अशी धमकी दिली. यावरुन पिडीत यांनी दि.12.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं. कलम-64,75,78 126(2), 351 (2),351 (3), सह बा.लै.अ.सं. अधिनियम 2012 कलम 4,8,12,15 सह अ.जा.ज.अ.प्र.कायदा कलम 3(1)(w)(I), 3(1) (w) (II), 3(2)(va), 3(2)(पाच) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • जनसंपर्क विभाग धाराशिव पोलीस
error: Content is protected !!