August 9, 2025

धाराशिव जिल्हा पोलिसनामा

  • धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.09 डिसेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 352 कारवाया करुन 1,16,750 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
  • “ अवैध मद्य विरोधी कारवाई.”
  • तामलवाडी पोलीस ठाणे:आरोपी नामे-निलावती हानुमंत मोटे, वय 65 वर्षे, रा.गोंधळवाडी ता. तुळजापूर जि.धाराशिव या दि.09.12.2024 रोजी 19.50 वा. सु.गावातील आपल्या राहत्या घरासमोर अंदाजे 910 ₹ किंमतीच्या देशी विदेशी दारुच्या 26 सिलबंद बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेल्या जप्त करण्यात आल्या.यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये तामलवाडी पो ठाणे येथे गुन्हा नोंदविला आहे.
    कळंब पोलीस ठाणे:आरोपी नामे-साखरबाई आबा काळे, वय 55 वर्षे, रा.अंदोरा ता.कळंब जि. धाराशिव या दि.09.12.2024 रोजी 18.40 वा. सु.अंदोरा पारधी वस्ती येथे अंदाजे 8,400 ₹ किंमतीचे 240 लिटर गावठी दारुचे गुळमिश्रीत रासायनिक द्रव अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेले जप्त करण्यात आले. आरोपी नामे-सगिंता शंकर काळे, वय 40 वर्षे, रा. कन्हेरवाडी ता. कळंब जि.धाराशिव या दि.09.12.2024 रोजी 18.50 वा. सु. कन्हेरवाडी येथे अंदाजे 3,000 ₹ किंमतीची 30 लिटर गावठी अवैध विक्रीच्या उद्देशाने जवळ बाळगलेली जप्त करण्यात आली. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य मनाई कायदा कलम- 65(ई),अन्वये कळंब पो ठाणे येथे स्वतंत्र 2 गुन्हे नोंदविले आहेत.
  • “ रहदारीस धोकादायकरित्या वाहन उभी करणाऱ्यावर गुन्हा नोंद.”
    तामलवाडी पोलीस ठाणे :सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायक रित्या वाहने उभे करणाऱ्या चालकांवर तामलवाडी पो.ठा.च्या पथकाने काल दि.09.12.2024 रोजी 17.00 वा.सु.कारवायी केली. यात 1)विजयकुमार आप्पासाहेब गाटे, वय 28 वर्षे, रा. दहीवडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी तुळजापूर ते दहीवडी जाणारे रोडवर पाण्याच्या टाकी जवळ मोटरसायकल क्र एम.एच. 25 ए.एफ 7393 ही सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायक रित्या उभे करुन भा.दं.सं.कलम- 285 चे उल्लंघन केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द तामलवाडी पो.ठा.येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :सार्वजनिक रस्त्यावर रहदारिस धोकादायक रित्या वाहने उभे करणाऱ्या चालकांवर नळदुर्ग पो.ठा.च्या पथकाने काल दि.09.12.2024 रोजी 14.00 वा.सु.कारवायी केली. यात 1)शिरीष शिवाजी डुकरे, वय 40 वर्षे, रा.माउली नगर नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी बसस्थानक नळदुर्गचे उजवे गेट समोर ॲपे रिक्षा क्र एम.एच. 25 एम 310 ही सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायक रित्या उभे करुन भा.दं.सं.कलम- 285 चे उल्लंघन केले.यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो.ठा.येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
    शिराढोण पोलीस ठाणे:आरोपी नामे-अमोल दातु थोरात, वय 32 वर्षे, रा.देवधानोरा ता. कळंब जि. धाराशिव हे दि.09.12.2024 रोजी 14.50वा. सु. आपल्या ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 एझेड 1660 ही जवळा पाटी येथे कळंब ते ढोकी रोडवर मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द शिराढोण पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
  • “ प्राण्यांना निर्दयपणे वागणूक देवून वाहतुक करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
  • मुरुम पोलीस ठाणे : आरोपी नामे-चॉदपाशा हणमंत गिरमला घाडगे, वय 35 वर्षे, रा. देवशर ता इंडी जि. विजापूर, बंदेनवाज अब्दुल रज्जाक मुजावर, वय 24 वर्षे, रा. बनतनाळ ता. इंडी जि. विजापूर यांनी दि.09.12.2024 रोजी 20.00 वा. सु. येणेगुर गावात एनएच 65 रोडवर येथे आयशर टॅम्पो क्र के ए 28 एए 9940 या मध्ये एकुण 20 म्हशीचे लहाण वगार वाहनासह अंदाजे 9,10,000₹ किंमतीचे वाहना मध्ये दाटीवाटीने बांधून निर्दयतेने वागणुक देवून त्यांचे चारा पाण्याची व्यवस्था न करता जनावरांचे कत्तलीसाठी बेकायदेशीर वाहतुक करत असताना मुरुम पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे नमूद व्यक्तीविरुध्द प्राण्यास क्रुरतेने वागण्यास प्रतिबंध अधिनियम कलम 11(1) (ए) (डी) (एच), सह 119 म.पो.का. 1951 सह प्राणी संरक्षण कायदा सुधारित 1995 कलम 5(अ), 5(ब) व 9 सह भा.न्या सं कलम 3 (5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल.”
    तुळजापूर पोलीस ठाणे:मयत नामे-मयुरी सुरज गुरव, वय 25 वर्षे, रा. आपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.08.12.2024 रोजी 18.00 वा. सु.आपल्या राहत्या घरात लोखंड्या ॲगलला गळफास घेवून आत्महत्या केली. आरोपी नामे- सुरज धोंडीबा गुरव (पती), धनश्री धीरज गुरव, (जाउ), धीरज धोंडीबा गुरव (दीर), छाया धोंडीबा गुरव (सासु) सर्व रा. आपसिंगा ता. तुळजापूर जि. धाराशिव (पती व जाउ) यांचे अनैतिक संबध असलेले माहेरच्या लोकांना का सागिंतले व लॅबेरिटी टाकण्यासाठी पाच लाख रुपये माहेरहुन घेवून आली नाही या कारणावरुन मयत मयुरी हिस दिलेल्या जाचास व मानसिक त्रासास कंटाळून मयुरी यांनी आत्महत्या केली आहे. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-संजय विठ्ठल गुरव, वय 70 वर्षे, रा. तुरोरी ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.09.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.न्या.सं.कलम- 108, 80,85 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
  • परंडा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-शंकर भगवान कोकाटे, वय 68 वर्षे, रा. शिवाजी नगर, परंडा ता. परंडा जि. धाराशिव यांचे किरणा दुकानावरील पत्रा अज्ञात व्यक्तीने दि.08.12.2024 रोजी 08.00 ते दि. 09.12.2024 रोजी 09.00 वा. सु. उचकटून आत प्रवेश करुन ओणीडा टिव्ही 24 इंची व डि व्ही आर असा एकुण 15,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-शंकर कोकाटे यांनी दि.09.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन परंडा पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331 ( 4), 305(ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-विजय गणेश राठोड, वय 48 वर्षे, रा.कौडगाव तांडा ता. जि. धाराशिव यांचे घरातील कपाटातील डब्यात ठेवलेले 29 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा एकुण 85, 390 ₹ किंमतीचा माल हा आरोपी नामे- करण राजाभाउ राठोड, रा. कौडगाव तांडा ता. जि. धाराशिव यांनी दि.14.09.2024 रोजी 09.00 ते दि. 12.10.2024 रोजी 05.00 वा.सु. चोरुन नेले. असा स्थानिक अर्ज क्र 59/2024 दि. 26.11.2024 रोजी दिलेल्या चौकशी अर्जात फिर्यादी नामे-विजय राठोड यांनी दि.09.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 305( ए) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-सुधाकर भाउराव कांबळे, वय 35 वर्षे, रा.दहिटणे ता. अक्कलकोट जि. सोलापूर हे दि. 30.11.2024 रोजी 11.30 वा. सु.निलेगाव येथील सातबारा हॉटेलच्या बाजूस निलेगाव शिवार येथे यांची अंदाजे 80,000 ₹ किंमतीची स्कुटी क्र एमएच 13 ईजी 9905 व डिग्गी मधील सॅमसंग कंपनीचा मोबाईल हा सुधाकर कांबळे हे नैसर्गिक विधीसाठी गेले असता अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-सुधाकर कांबळे यांनी दि.09.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “मारहाण.”
  • ढोकी पोलीस ठाणे :आरोपी नामे-अशितोष ज्ञानदेव ताटे, जयश्री ज्ञानदेव ताटे, लक्ष्मी ज्ञानदेव ताटे, ज्ञानदेव विश्वनाथ ताटे, सर्व रा. पळसप ता. जि. धाराशिव यांनी दि.07.12.2024 रोजी 18.00 वा. सु. पळसप येथे फिर्यादी नामे-राम भारत मगर, वय 32 वर्षे, रा. पळसप ता. जि. धाराशिव यांना नमुद आरोपीने साउंडवर मोठ मोठ्याने गाणे वाजवण्याचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, खोऱ्याचा लोखंडी दांडा व काठीने मारहाण करुन गंभीर जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-राम मगर यांनी दि.09.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 117, 118(1), 115, 351, (2), 351(3), 3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • येरमाळा पोलीस ठाणे :आरोपी नामे-अनिल रामा काळे,रा. खामकरवाडी पारधी पिढी, आकाश सुरेश शिंदे, सुरेश शिंदे, सत्तुबाई सुरेश शिंदे, शितल सुरेश शिंदे, राधाबाई आकाश शिंदे रा. येरमाळा ता. कळंब जि. धाराशिव यांनी दि.07.12.2024 रोजी 17.00 वा. सु. डी सी सी बॅके समोर येरमाळा येथे फिर्यादी नामे-बालाबाई अनिल काळे, वय 35 वर्षे, रा. खामकरवाडी पारधी पिढी ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी अनैतिक संबध व घर नावावर करण्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बालाबाई काळे यांनी दि.09.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 118(1), 115(2), 352, 351, (2), 351 (3), 189(2), 191(2), 191(3), 190 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “पोलीस असल्याची बतावणी करुन फसवणुक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल .”
  • उमरगा पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-बलभिम लक्ष्मणराव माने, वय 60 वर्षे, रा. कदेर ता. उमरगा जि. धाराशिव व त्यांची पत्नी असे दि. 07.12.2024 रोजी 09.15 ते 09.30 वा. सु. कराळी पाटी पासून ते कराळी कडे जाणारे रोडवरुन मोटरसायकलवरुन जात होते. दरम्यान अनोळखी तीन इसमांनी दोन मोटरसायकल वर येवून बलभिम माने यांचे मोटरसायकलला समोरुन मोटरसायकल उभा करुन आम्ही पोलीस डिपार्टमेंटचे आहोत. असे म्हणून खोटे ओळखपत्र दाखवून काल रात्री येथे एका महिलेचे दागिने लुटून मारहाण झाली आहे. तरी तुम्ही तुमचे गळ्यातील सोने नाणे व्यवस्थीत सांभाळून तुमच्या जवळ ठेवा.असे म्हणून बलभिम माने यांची दिशाभुल करुन 39 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने एकुण 98,750₹ किंमतीचे नेवून फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बलभिम माने यांनी दि.09.12.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 319(2),3(5)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • “रस्ता अपघात.”
  • तुळजापूर पोलीस ठाणे: मयत नामे-जीवन दास कांबळे, वय 46 वर्षे, व सोबत त्यांची पत्नी फिर्यादी नामे- दिपाली जीवन कांबळे, वय 44 वर्षे, त्यांची मुलगी व आरोपी नामे- अनिल जीवन कांबळे रा. अक्काले चाळ शेजारी शेवाळेवाडी मांजरी फार्म पुणे मुळ गाव उत्का ता. औसा जि. लातुर असे दि.01.12.2024 रोजी 22.45 वा.सु. कांक्रबा गावाजवळ औसा तुळजापूर रोडवरुन ॲटो रिक्षा क्र एमएच 12 डब्ल्यु आर 1166 या मधून जात होते. दरम्यान अनिल कांबळे यांनी यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून रिक्षा रोडवर पल्टी झाला. या अपघातात जीवन कांबळे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. तर दिपाली कांबळे, त्यांची मुलगी व अनिल कांबळे हे किरकोळ व गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-दिपाली कांबळे यांनी दि.09.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(ए), 125(बी), 106(1) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
  • उमरगा पोलीस ठाणे: मयत नामे-शाम विठ्ठल धनेराव, वय 32 वर्षे,रा. बेटजवळगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.04.12.2024 रोजी 21.15 ते 21.30 वा.सु. माडत पाटी येथील हॉटेल वरुन नॉनव्हेजची भाजी आणण्यासाठी रोडवरुन पायी जात होते. दरम्यान मोटरसायकल क्र के.ए. 32 एच.जे. 5212 चा चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून शाम धनेराव यांना पाठीमागून धडक दिली. या अपघातात शाम धनेराव व मोटरसायकलच्या पाठीमागे बसलेला एक इसम हे दोघे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-केशरबाई विठ्ठल धनेराव,वय 62 वर्षे, रा. बेटजवळगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.09.12.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(बी), 106(1) सह 134 (अ) (ब), 184 मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
error: Content is protected !!