परांडा (डॉ.शहाजी चंदनशिवे) – दि.28 ऑक्टोबर 2023 येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या वतीने महा ग्रामीण क्रेडिट एक्सपो 2023 चे आयोजन करण्यात आले होते . हा कार्यक्रम दिनांक 28 ऑक्टोबर रोजी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे आयोजित करण्यात आला होता.यावेळी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे शाखा व्यवस्थापक अक्षय कांबळे, सहाय्यक शाखा व्यवस्थापक अभिजीत शिंदे कर्मचारी आनंद बनसोडे यांची उपस्थिती होती . महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा परंडा येथे महा ग्रामीण क्रेडिट 2023 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या एक्सपो दरम्यान एकाच वेळी स्पेशल गृह कर्ज वाहन कर्ज व्यापारी कर्ज मार्टगेज कर्ज माल तारण कर्ज आदि कर्ज प्रकरणांना जागेवरच मंजुरी दिली जाणार आहे . महाराष्ट्र ग्रामीण बँक हे ग्राहकांना अनेक सुविधा प्रदान करीत असून या निमित्ताने मोठ्या प्रमाणावर ग्राहकांना सेवा पुरविण्याचा बँकेचा मानस आहे असे शाखा व्यवस्थापक अक्षय कांबळे यांनी सांगितले .यानुसार हा कार्यक्रम आयोजित केला आहे .या कार्यक्रमाचा बँकेच्या परंडा कार्यक्षेत्रातील लोकांनी परंडा शाखेची व इतर गावातील लोकांनी आपल्या जवळच्या शाखेत तालुका शाखा किंवा क्षत्रिय कार्यालय बार्शी रोड परंडा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शाखा व्यवस्थापक अक्षय कांबळे व सहाय्यक शाखा व्यवस्थापक अभिजीत शिंदे यांनी केले आहे . यावेळी महाविद्यालयातील अनेक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांना जागेवरच कर्ज मंजुरी दिली आहे .यामध्ये अनेक कर्मचाऱ्यांना गृह कर्ज व वैयक्तिक कर्ज याचा लाभ मिळाला आहे .महाराष्ट्र ग्रामीण बँकेने आयोजित केलेल्या या कर्ज मेळाव्या मुळे अनेक कर्मचाऱ्यांना या कर्जाचा आर्थिक फायदा आणि आपल्या अनेक अडचणी दुर झालेल्या आहेत असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी मत व्यक्त करताना सांगितले . या कार्यक्रमाचा बँकेच्या परांडा कार्यक्षेत्रातील लोकांनी परंडा शाखेशी व इतर गावात लोकांनी आपल्या जवळच्या शाखेत तालुका शाखा किंवा क्षेत्रिय कार्यालय बार्शी रोड लातूर यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सहाय्यक शाखा व्यवस्थापक अभिजीत शिंदे यांनी केले आहे .
महाविद्यालयाच्या वतीने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील जाधव, उपप्राचार्य डॉ महेशकुमार माने,महाविद्यालयाचे स्टाफ सेक्रेटरी डॉ.शहाजी चंदनशिवे,कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. किरण देशमुख, कार्यालयीन अधीक्षक भाऊसाहेब दिवाने,वरिष्ठ लिपिक बाबासाहेब क्षिरसागर यांनी बँकेच्या या स्तुत्य उपक्रमासाठी अभिनंदन केले.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात