कळंब ( माधवसिंग राजपूत ) – दोन दिवसापासून कळंब शहराजवळील शेतातील विहिरीत पडलेल्या सायाळ ( साळींदर ) या वन्यजीव प्राण्याला कळंब येथील पक्षप्रेमी नागरिक,यांनी वनविभाग कर्मचाऱ्यांशी संपर्क केला व दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सतत दोन तास प्रयत्न करून वन विभाग कर्मचारी व व त्यांचे सहाय्यक यांनी सायाळला विहिरीच्या वरती काढण्यात यश आले. कळंब – हावरगाव रस्त्यावरील व कळंब शहराच्या लगत ओढ्या काठी संदिपान करंजकर यांची शेती आहे.करंजकर आपल्या शेतातील विहिरीवरील मोटार चालू करण्यासाठी २ डिसेंबर रोजी गेले असता त्यांना विहिरीत पडलेला सायाळ पक्षी आढळून आला.विहीर पन्नास फूट खोल असून विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या नाहीत. यामुळे या पक्षाला वरती कसे काढायचे हा प्रश्न त्यांच्यापुढे होता.त्यांनी या विषयाची माहिती कळंब येथील प्राणीप्रेमी ज्येष्ठ नागरिक महासंघाचे जिल्हाध्यक्ष महादेव महाराज अडसूळ व सामाजिक कार्यकर्ते माधवसिंग राजपूत यांना दिली.आडसूळ यांनी सायाळला वाचविण्यासाठी काय करता येईल याविषयी माहिती घेतली व भूम येथील वनविभाग कार्यालयाशी संपर्क केला व यानुसार दिनांक ३ डिसेंबर रोजी या कार्यालयाचे वन क्षेत्रपाल दत्तात्रेय फरताडे यांच्याशी संपर्क झाला व या कामासाठी वनमजूर कालिदास जाधव व त्यांचे सहाय्यक सुरेश चव्हाण व प्रकाश चव्हाण पोहोचले.कमरेला दोर बांधून विहिरीत उतरून सतत दोन तास प्रयत्न केल्या नंतर ३६ तास विहिरीत अडकून पडलेल्या या प्राण्याला विहिरीच्या बाहेर काढण्यात यश आले.यानंतर येडशी येथील अभयारण्यात सोडण्यासाचा निर्णय घेण्यात आला, सायाळ हा वन्यजीव असून डोंगर,झाडी,ओढा, नदीकाठावरील शेती,ऊस शेती यामध्ये वास्तव्य करतो.याला सायाळ ,साळ ,साळू या नावाने ओळखतात याची लांबी तीन फूट पर्यंत असते शेपूट आठ ते नऊ सेंटीमीटर लांब असते शरीरावरील राठ, टनक पिच्छदंड सायाळ (साळींदर ) याचे वैशिष्ट्ये आहे.भीतीदायक परिस्थितीत संरक्षणासाठी त्याचे पीछेदंड ताठ होतात त्याच्या शत्रूशी लढताना तो त्याची शेपटी असलेले काटेरी पीच्छदंड याचा उपयोग करतो तो जमिनीत किंवा कपारीत बिळात राहतो हा प्राणी निशाचर आहे वन्यजीव संरक्षण कायद्याने या प्राण्याच्या शिकारीस बंदी घातलेली आहे.
वाढती जंगलतोड, शहरीकरण प्राण्यांच्या शिकारी यामुळे वन्यजीव संख्या झपाट्याने कमी होत असून पक्षी व प्राण्याच्या अनेक प्रजाती नामशेष होत आहेत वन्यजीव टवसंरक्षणासाठी कायदे करण्यात आले आहेत , याविषयी नागरिकात जागृती झाली पाहिजे.
More Stories
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात
संचालिका सौ.अंजली मोहेकर यांची विद्याभवन प्राथमिक विद्यामंदिरास सदिच्छा भेट
मोहेकर महाविद्यालयात ग्रंथालय शास्त्राच्या राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन