August 8, 2025

१ डिसेंबर रोजी परीक्षा केंद्रावर कलम १६३ चे प्रतिबंधात्मक आदेश

  • धाराशिव (जिमाका) – महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा-२०२४ ही परीक्षा रविवार दि १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १२ व दुपारी ३ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत या कालावधीत खालील उपकेंद्रावर आयोजीत करण्यात आली आहे.
    त्या बाबतचा तपशील खालीलप्रमाणे आहे.परिक्षा केंद्राचे नांव व उमेदवारांची संख्या कंसात दिली आहे.श्रीपतराव भोसले हायस्कूल, पहिला मजला,मेन रोड,धाराशिव (३१२),श्रीपतराव भोसले हायस्कूल,दुसरा मजला,मेन रोड,धाराशिव (५०४), श्रीपतराव भोसले हायस्कूल ज्यु. कॉलेज तिसरा मजला,मेन रोड,धाराशिव (४३२), श्रीपतराव भोसले हायस्कूल,(ई-टेक्नो),नवीन ईमारत,मेन रोड,धाराशिव (३३६),रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,नवीन ईमारत, मेन रोड,धाराशिव (२४०), छत्रपती शिवाजी हायस्कूल,तांबरी विभाग, धाराशिव (३८४),विद्यामाता हायस्कूल,सांजा चौक,छत्रपती संभाजीनगर,बायपास रोड,धाराशिव (२६४),जिल्हा परिषद कन्या प्रशाला, शहर पोलीस स्टेशन समोर,धाराशिव (२४०),रामकृष्ण परमहंस महाविद्यालय,जुनी इमारत, तळमजला व पहिला मजला,मेन रोड,धाराशिव (२८८) असे एकूण ३ हजार उमेदवार परीक्षा देणार आहे.
    परीक्षा केंद्राच्या परिसरात बाह्य उपद्रव कमी करणे,परीक्षार्थींना कसलाही अडथळा होऊ नये या दृष्टीने परीक्षेसाठी संबधित नसलेल्या व्यक्तीस परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करण्यास मनाई करणे,तसेच परीक्षा केंद्राच्या परिसरात झेरॉक्स,फॅक्स,इमेल,रेडीओ,इंटरनेट सुविधा, भ्रमणध्वनी (मोबाईल),संगणक, गणनायंत्र (कॅलक्युलेटर) व अशा इतर प्रकारच्या स्वरुपातील बाबी विद्यार्थ्यांना पुरवठा करण्यात येवु नये म्हणुन परीक्षा केंद्राच्या सभोवताली १०० मीटर परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अपर जिल्हादंडाधिकारी धाराशिव यांनी अधिकाराचा वापर करुन वरील परीक्षा केंद्राचे १०० मीटरच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश परीक्षेच्या दिवशी लागू राहणार आहे.
    परीक्षा केंद्राचे परिसरात कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाही,परीक्षा केंद्राचे परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेस बाधा निर्माण होईल असे कृत्य करता येणार नाही,परीक्षा केंद्राचे १०० मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर्स,पानपट्टी,टायपिंग सेंटर,एसटीडी बुथ,ध्वनिक्षेपक,कॉम्प्युटर सेंटर्स, इंटरनेट कॅफे इत्यादी माध्यमे बंद राहतील,परीक्षा केंद्राचे परिसरात मोबाईल फोन,सेल्युलर फोन,फॅक्स,ईमेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल.कोणत्याही व्यक्तींकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यात येणार नाही.परीक्षा केंद्रावर कोणत्याही वाहनांस प्रवेशास मनाई राहील.परीक्षेशी संबंधीत नसलेल्या व्यक्तींना परीक्षा केंद्रात प्रवेश नसेल.केवळ संबधित परीक्षा केंद्रावर नेमणुक केलेले अधिकारी/कर्मचारी,शासकिय कामावरील अधिकारी व कर्मचारी,संबधीत शाळेचे मुख्याध्यापक /शिक्षक/कर्मचारी आणि परीक्षार्थी यांनाच परीक्षा केंद्रामध्ये प्रवेश राहील.इतरांना (परिक्षार्थींच्या नातेवाईकासह) प्रवेश असणार नाही.
    परीक्षा केंद्राचे १०० मीटरचे आवारात ५ किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येता येणार नाही.परीक्षा केंद्रात परीक्षेशी संबधित अधिकारी/कर्मचारी आणि परीक्षार्थी सोडून कुणालाही प्रवेश असणार नाही.हे आदेश परीक्षा केंद्रावर काम करणारे अधिकारी/कर्मचारी,परीक्षार्थी, परीक्षा केंद्रावर निगरानी करणारे अधिकारी व पोलीस अधिकारी/कर्मचारी यांचेबाबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्ये पार पाडण्याचे अनुषंगाने लागू राहणार नाहीत.हे आदेश १ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ७ वाजताच्या कालावधीत वरील परीक्षा केंद्राच्या परिसरात लागु राहतील.या आदेशाची अवमानना केल्यास भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा नोंदवून फौजदारी कारवाई करण्यात येईल.असे या आदेशात नमूद केले आहे.
error: Content is protected !!