कळंब – सत्ता,संपत्ती,जात, धर्मांधतेच्या जोरावर लोकशाहीचे वस्त्रहरण करणाऱ्यांच्या निषेधार्थ आणि संविधानातील मूलभूत अधिकार व संरक्षणासाठी महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे नेते डॉ.बाबा आढाव यांनी दि.२८ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ पर्यंत पुणे येथील महात्मा फुले यांच्या वाड्यात तीन दिवसाचे आत्मक्लेश उपोषण सुरू केले आहे. डॉ.बाबा आढाव यांच्या उपोषणास पाठिंबा देण्यासाठी भारत जोडो अभियान धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने कळंब येथील तहसील कार्यालयासमोर दिनांक ३० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ ते सायंकाळी ५.०० पर्यंत लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील सामाजिक संस्था,संघटना,विचारवंत आणि संविधान प्रेमींनी सहभाग नोंदवावा असे विनम्र आवाहन भारत जोडो अभियानाचे धाराशिव जिल्हा समन्वयक साथी सुभाष घोडके यांनी केले आहे.
More Stories
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी
रक्षाबंधन
प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या प्रीती महादवारसह यशस्वी छात्राध्यापकांचा गौरव सोहळा उत्साहात