धाराशिव शहर वाहतुक शाखा व संबंधीत पोलीस ठाण्यांनी महत्त्वाच्या रस्त्यांवर दि.16 नोव्हेंबर रोजी मोटार वाहन कायदा- नियम भंग प्रकरणी एकुण 418 कारवाया करुन 4,18,900 ₹ ‘तडजोड शुल्क’वसुल केले आहे.
“ जुगार विरोधी कारवाई.”
धाराशिव शहर पोलीस ठाणे :जुगार विरोधी कारवाई दरम्यान धाराशिव शहर पोलीसांनी दि.16.11.2024 रोजी 19.45 वा. सु.धाराशिव शहर पो ठाणे हद्दीत 2 छापे टाकले. यावेळी आरोपी नामे-पाशा जिलानी तांबोळी, वय 35 वर्षे,रा.गल्ली नं 03 खाजा नगर धाराशिव ता. जि. धाराशिव हे 19.45 वा. सु. सांजा रोडलगत चौकात पान टपरी समोर धाराशिव शहर येथे मिलन नाईट जुगाराचे साहित्यासह एकुण 540 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. तसेच आरोपी नामे-राजु अमारनाथ पारसी, वय 32 वर्षे,रा. झोरे गल्ली धाराशिव ता. जि. धाराशिव हे 18.40वा. सु. देशपांडे स्टॅण्ड भाजी मंडई धाराशिव येथे मिलन नाईट जुगाराचे साहित्यासह एकुण 1,520 ₹ रक्कम स्वत:चे कब्जात बाळगलेले धाराशिव शहर पो. ठाणेच्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) अन्वये धाराशिव शहर पो ठाणे येथे स्वतंत्र 2गुन्हे नोंदवले आहेत.
“रहदारीस धोकादायरीत्या वाहन उभे करणाऱ्यांवर गुन्हे नोंद.”
आनंदनगर पोलीस ठाणे :आरोपी नामे-अजीज मुर्तजा शेख, वय 28 वर्षे, रा. राजुरी ता. जि. धाराशिव यांनी दि.16.11.2024 रोजी 11.30 वा. सु. आपल्या ताब्यातील मॅजिक वाहन क्र एमएच 14 डीएकृस 8993 हा सांजा गावाकडे जाणारे मुख्य डांबरी रोडवर धाराशिव येथे सार्वजनिक रस्त्यावर रहदारीस धोकादायकरीत्या उभे केलेले असताना आनंदनगर पोलीसांना मिळून आले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द भारतीय न्याय सहिंता कलम 285अन्वये आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मद्यपी चालकावर गुन्हा दाखल.”
नळदुर्ग पोलीस ठाणे:आरोपी नामे-खादीर उस्मान अत्तार, वय 44 वर्षे, रा.तिपरात ता. बसवकल्याण जि. बिदर राज्य कर्नाटक हे दि.15.11.2024 रोजी 23.00 वा. सु. आपल्या ताब्यातील ट्रक क्र जीजे 16 एडब्ल्यु 0696 हा सोलापूर ते हैद्राबाद जाणारे रोउवर सितारा हॉटेल समोर नळदुर्ग येथे मद्यधुंद अवस्थेत चालवून मो.वा.का. कलम- 185 चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द नळदुर्ग पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.
“ मालमत्तेविरुध्द गुन्हे.”
तुळजापूर पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-विलास कोंडीबा सरवदे, वय 63 वर्षे, रा. समता नगर पाण्याच्या टाकीजवळ तुळजापूर धाराशिव ता.जि. धाराशिव यांचे राहते घराचे कडी कोंडा अज्ञज्ञत व्यक्तीने दि. 09.11.2024 रोजी 01.00 ते दि.10.11.2024 रोजी 20.30 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विलास सरवदे यांनी दि.16.11.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 331(3), 331(4), 305 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-श्रीमती मंगल विठ्ठल जेठे, वय 43 वर्षे, रा. फुलवाडी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 20,000₹ किंमतीची हिरो होंडा एच एफ डिलक्स मोटरसायकल, एक देवणी जातीची गाय, एक म्हैस, असे एकुण 50,000₹ किंमतीचा माल हा दि. 14.11.2024 रोजी 20.00 ते दि. 15.11.2024 रोजी 05.00 वा. सु.फुलवाडी शिवार गट नं 10/1,122/4 मधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-मंगल जेठे यांनी दि.16.11.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ढोकी पोलीस ठाणे :फिर्यादी नामे-अशोक बळीराम साठे, वय 42 वर्षे, रा. देवळाली ता. जि. धाराशिव यांचे अंदाजे19,000₹ किंमतीचे स्प्रिंकलचे 10 नोजल हे दि. 16.11.2024 रोजी 09.00 वा. सु. कोल्हेगाव शिवारातील शेत गट नं 264 ते 265 मधून अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अशोक साठे यांनी दि.16.11.2024रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो ठाणे येथे भा.न्या.सं.कलम 303(2) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“मारहाण.”
वाशी पोलीस ठाणे :आरोपी नामे-बजरंग गोयकर, बळीराम गोयकर, आण्णा गोयकर, तुकाराम गोयकर, विलास गोयकर, बाबा गोयकर, कृष्णा गोयकर, चांदणी गोयकर, सुनिता बळीराम गोयकर,विश्रांती गोयकर, सुष्मा गोयकर, सुबाबाई गोयकर सर्व रा. घाटनांदुर ता. भुम जि. धाराशिव यांनी दि.16.11.2024 रोजी 13.00 वा. सु. घाटनांदुर शिवारतील शेत गट नं 197 मध्ये फिर्यादी नामे-आरती प्रशांत बुरुंगे, वय 26 वर्षे, रा. घाटनांदुर ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-आरती बुरुंगे यांनी दि.16.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो ठाणे येथे भा.दं.वि.सं. कलम 189(2),191(2),) 190, 115(2),352, 351 (2) (3) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
“रस्ता अपघात.”
धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे: मयत नामे-नेताजी संताराम चव्हाण, रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव हे दि.05.11.2024 रोजी 21.00 ते 21.30 वा. सु. ट्रॅक्टर क्र एमएच 25 एडब्ल्यु 2596 वरुन अंबेजवळगे ते घाटंग्री रस्त्याने जात होते. दरम्यान ट्रॅक्टर क्र एमएच 25 एच 3891 चा चालकाने त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगयी व निष्काळजीपणे चालवून नेताजी चव्हाण यांचे ट्रॅक्टरला धडक दिली. या अपघातात नेताजी चव्हाण हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- बाळु चंदु चव्हाण, वय 60 वर्षे, रा. घाटंग्री ता. जि. धाराशिव यांनी दि.16.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106(1),281 125 (अ), 125 (ब) सह कलम 184 मो वा का अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे: मयत नामे-अनोळखी इसम वय 30 वर्षे हे दि.12.11.2024 रोजी 02.00 वा. सु. बोरी शिवारातील पटेल धाब्या समोर धाराशिव ते तुळजापूर रजाणारे रोडवर वरुन पायी जात होते. दरम्यान ईटर्भ्गा कार क्र एपी 12 क्यु 1098 चा चालक आरोपी नामे- हसन बाकेरहुसेन कोहोडवाला रा. प्लॉट नं 456 साई सागर इनक्लेव्ह हसमत पेठ सिकंदराबाद पि.500009 यांनी त्याचे ताब्यातील कार ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून अनोळखी इसमास धडक दिली. या अपघातात अनोळखी इसम वय 30 वर्षे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- किरण श्रीहरी औताडे, पालीस हावलदार नेमणुक पोलीस ठाणे तुळजापूर यांनी दि.16.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106(1), 281, 125(ए)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा पोलीस ठाणे: मयत आरोपी नामे-अमरदिप नारायण लवटे, वय 24 वर्षे, रा. गुंजोटीवाडी ता. उमरगा.जि. धाराशिव व मयत आरोपी नामे-संजय विरण्णा राजगिरे, वय 50 वर्षे, व सोबत मयत नामे- उमादेवी संजय राजगिरे, वय 42 वर्षे, रा. व्ही. के. सलगर, ता. आळंद(कमलापूर) जि. कलबुर्गी, राज्य कर्नाटक हे दि.06.11.2024 रोजी 17.30 वा. सु. अमरदिप लवटे यांनी त्यांचे ताब्यातील मोटरसायकल क्र एमएच 25 ए.झेड.6583 ही कसगीवाडी शिवारात सिध्देश्वर मंदीरात बेनीतुरा नदीच्या पुलावर समोरुन येणारे ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात अपघात होवून गंभीर जखमी होवून मयत झाला. तर मयत आरोपी नामे-संजय विरण्णा राजगिरे मोटरसायकल क्र एमएच 25 एएक्स 8210 ही आळद येथुन उमरगा रोडने तुगावकडे जाताना समोरुन येणारे पिकअपला ओव्हरटेक करण्याचे नादात अपघात होवून गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- गोरखनाथ भाउराव शिंदे, पोलीस हावलदार नेमणुक उमरगा पोलीस ठाणे यांनी दि.16.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 281, 125(अ),125(ब) 106(1), 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
तुळजापूर पोलीस ठाणे: मयत आरोपी नामे-बिरु शहाजी सौदागर, वय 31 वर्षे, रा. कुंभारी, ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.09.11.2024 रोजी 21.30 वा. सु. मोटरसायकल क्र एमएच 13 बीबी 4815 वरुन जात होते. दरम्यान कुंभारी गावातील चज्ञैकातुन खाली गावात जात असताना गोविंद तांबे यांचे धरासमोरील रस्त्यावर कुंभारी येथे मयत आरोपी नामे- बिरु सौदागर यांनी त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही हायगयी व निष्काळजीपणे चालवून मोटरसायकल स्लिप होवून रस्त्यावर पडून गंभीर गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- राहुल अंबादास क्षिरसागर, रा. कुंभारी ता. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि.16.11.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तुळजापूर पो ठाणे येथे भा.न्या.सं. कलम 106(1), 281, 125(ब)अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
More Stories
धाराशिव शहरातील कचरा डेपो इतरत्र हलविण्याची शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाची मागणी
पहिला आयुर्वेदिक हिमोफिलिया संशोधन प्रकल्प ‘रक्तामृत’चा धाराशिवमध्ये दिमाखदार शुभारंभ
फॉरेस्टच्या गवतावर तणनाशक फवारणी करून वृक्षलागवडीची नासधूस:वनपालावर कारवाईची मागणी