August 9, 2025

महायुतीचे उमेदवार अजित पिंगळे यांचा प्रचाराचा शुभारंभ

  • कळंब – कळंब-धाराशिव मतदार संघाचे अधिकृत उमेदवार अजित पिंगळे यांच्या डोअर टू डोअर प्रचाराचा शुभारंभ दि.११ नोव्हेंबर २०२४ रोजी शहरातील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे मावळचे संसदरत्न खासदार श्रीरंग बारणे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून करण्यात आला.
    याप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की,जनतेच्या कल्याणकारी योजनेची महायुतीच्या सरकारची कामे ही सर्वसामान्य जनतेला कळावित व समाजातील तळागाळातील घटकांच्या हितासाठी काम करण्यासाठी येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूकीत धनुष्य बाण चिन्ह असणाऱ्या अजित पिंगळे यांना भरघोस मतांनी विजयी करावे.असे आवाहन केले तर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे यांनी विद्यमान आमदार व खासदारांच्या कटुनीतीला मतदारसंघातील जनता त्रस्त होऊन गेली आहे.
  • म्हणून कोणतेच विकास कामांचा अजिंडा नसणाऱ्या विद्यमान आमदार व महाविकास आघाडीला जनतेने मतदानातून जागा दाखवावी असे प्रतिपादन केले.
    उमेदवार अजित पिंगळे यांनी कळंब-धाराशिव मतदार संघाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि जनतेच्या हितासाठी काम करण्यासाठी येणाऱ्या २० तारखेला धनुष्य बाणावरील चिन्हावर मतदान करून विजयी करावे असे आवाहन केले.
    गावातील प्रमुख वस्त्यातील रॅली काढण्यात आली.
    याप्रसंगी महायुती व घटक पक्षातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह मतदारबंधू व तरुण मित्रमंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

 

error: Content is protected !!