August 9, 2025

धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदी भूषण करंजकर यांची निवड

  • कळंब – येथील भूषण भारतराव करंजकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा धाराशिव जिल्हा उपाध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील, भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकुर,भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य विनोद गपाट ,जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहराजे निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली असून युवकांचे, विद्यार्थ्यांचे, लोकांचे प्रश्न सोडविणे तसेच पक्ष सघटन मजबुत करण्यासाठी जोमाने काम करावे, यासाठी निवड करण्यात आली आहे, असे निवडपत्रात म्हटले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. या निवडीबद्दल मनोज साळुंखे,अण्णासाहेब शिंदे,सोमनाथ टिंगरे,सिद्धेश  भोसले,बालाजी मडके, विशाल पवार,महेश काळे, अशोक क्षीरसागर, गोविंद आडसूळ, नरसिंग लोमटे, पवन म्हेत्रे यांनी अभिनंदन केले आहे.

error: Content is protected !!