August 9, 2025

सेवानिवृत्त मुख्याध्यापक डी.के. कुलकर्णी अनंतात विलीन

  • कळंब (साक्षी पावनज्योत वृत्तसेवा ) – सेवानिवृत्त मुख्याध्यापक तथा विद्यार्थी प्रिय शिक्षक डी.के. कुलकर्णी यांचे वयाच्या ७४ वर्षी दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी १०.४५ वाजता सह्याद्री हॉस्पिटल पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त असलेले डि.के.सरांचे शैक्षणिक, सामाजिक त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्हा मुख्याध्यापक संघ,साने गुरुजी कथामाला,ज्येष्ठ नागरिक संघ आणि इतर संघटना संस्थाच्या विविध पदावरून केलेल्या कार्यामुळे विविध स्तरातील लोकांसोबत स्नेहबंधाचे जाळे घट्ट विणले गेले होते.
    शि.म. ज्ञानदेव मोहेकर गुरुजींच्या संस्थेत उत्कृष्ट सेवा बजावत असताना गुरुजींचे पावनज्योत वर्तमानपत्राचे काही काळ डी.के.सरांनी संपादन केले होते.
    शांत,संयमी,वेळेप्रसंगी कठोरता तर लव्हाळ्याप्रमाणे लवचिकता, शिस्तप्रिय असे सर्व गुण संपन्न बहुआयामी डी.के.सरांनी वक्तृत्वाच्या कौशल्यातून सर्व जाती-धर्मातील लोकांना आपल्यासी करून स्नेहभाव जोपासला होता.
    दिनांक १ ऑक्टोबर २०२४ रोजी धाराशिव येथील सामाजिक न्याय भुवनच्या सभागृहात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त केलेल्या जोशपूर्ण भाषणातून ज्येष्ठांनी आनंदी राहून जीवन उर्वरित जगण्याचा सल्ला दिला होता तर तुरुणांनी आपल्या आई-वडिलांना वृद्धाश्रमात न पाठवता त्यांची सेवा करावी असे आवाहन केले होते. त्यांच्या जोशपूर्ण भाषणामुळे संपूर्ण सभागृहातील जेष्ठांना जगण्याची नवसंजीवनी मिळाली खरी पण १ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी ६.०० च्या दरम्यान कळंब येथील उषा-किरण या निवासस्थानी हृदयविकाराचा पहिला झटका आला.चि.डॉ. गिरीष कुलकर्णी यांनी तात्काळ हृदयरोग तज्ञ डॉ.लक्ष्मण जाधवर यांच्या दवाखान्यात भर्ती केले. डॉ.जाधवर यांच्या निगराणीत उपचार सुरू असतानीच दुसरा झटका आल्यामुळे रात्री ११.०० च्या दरम्यान लातूरच्या हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. चार दिवसांनी लातूरहून पुणे येथील सह्याद्री हॉस्पिटल मध्ये हलवण्यात आले.१२ दिवस शर्तीचे प्रयत्न सुरू असतानीच तेराव्या दिवशी दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सायंकाळी १०.४५ च्या दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. दिनांक १५ ऑक्टोबर २०२४ रोजी दुपारी १२ च्या दरम्यान कळंब येथील मांजरा काठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
    डी.के.सरांच्या ७२ व्या वाढदिवसानिमित्त साक्षी पावनज्योतचा विशेषांक प्रकाशित करून त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला होता. अंत्यसंस्कारासाठी विविध स्तरातील,विविध जाती धर्मातील प्रचंड जनसमुदाय जमला होता. याप्रसंगी प्राचार्य काकासाहेब मुंडे,प्रा.एम.डी.देशमुख, मुख्याध्यापक सुरेश टेकाळे, ह.भ.प महादेव महाराज अडसूळ,अँड.त्रिंबक मनगिरे, डॉ.रामकृष्ण लोंढे,नितीन तावडे, बालाजी तांबे,आमदार विक्रम काळे,प्राचार्य सूर्यकांत जगदाळे,डॉ.बी.आर.पाटील, सेवानिवृत्त मुख्याध्यापक बी.डी.शिंदे,प्रभाकर कापसे, प्रा. डॉ.संजय कांबळे,प्रकाश भडंगे, विलास मिटकरी,माधवसिंग राजपूत,सेवानिवृत्त मुख्याध्यापक सी.आर.घाडगे,डॉ.रमेश जाधवर,प्राचार्य महादेव गपाट,सा.साक्षी पावनज्योत संपादक सुभाष घोडके,उपसंपादक माधवसिंग राजपूत आदिंनी श्रद्धांजलीपर मनोगते व्यक्त केली.
error: Content is protected !!