August 9, 2025

भारत सरकार शिष्यवृत्ती महाविद्यालयांनी प्रलंबित अर्ज तात्काळ सादर करावे

  • धाराशिव (जिमाका) – इतर मागास बहुजण कल्याण विभागाकडून व्हीजेएनटी,ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील भारत सरकार शिष्यवृत्ती,शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क प्रतिपुर्ती,राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती व व्यावसायिक पाठ्यक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षातील अर्ज भरण्यासाठी http://mahadbtmahit.gov.in हे संकेतस्थळ २५ जुलै २०२४ पासून सुरू केले आहे.

    सन २०२४- २५ करिता बहुतांश विद्यार्थ्यांनी महाडीबीटी प्रणालीवर अर्ज भरले आहेत व ते अर्ज महाविद्यालय स्तरावर प्रलंबित आहेत या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी अद्यापपर्यंत अर्जांची पडताळणी करून सहाय्यक संचालक,इतर मागास बहुजण कल्याण या कार्यालयाकडे सादर केले नाहीत.

  • जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांनी सन २०२४ – २५ करिता आपल्या महाविद्यालयाच्या लॉगिन वरती प्रलंबित असलेले व्हीजेएनटी, ओबीसी व एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे भारत सरकार शिष्यवृत्तीचे पात्र अर्ज मंजुरीकरीता तात्काळ कार्यालयाकडे सादर करावे.
  • अर्ज सादर करतांना शाळा सोडलेला दाखलाव गुणपत्रक हे मुळ प्रतच असावेत याची दक्षता घ्यावी.ज्या अर्जामध्ये त्रुटी असतील असे अर्ज त्रुटी पुर्तता करुनच कार्यालयाकडे मंजुरीसाठी सादर करावेत.
  • महाविद्यालयाच्या लॉगिनला एकही अर्ज प्रलंबित राहणार नाही.याची दक्षता घ्यावी.तसेच ज्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यंत शिष्यवृत्ती अर्ज भरलेले नाहीत अशा विद्यार्थ्यांना अर्ज भरण्यासाठी महाविद्यालय स्तरावरून सूचित करावे.असे इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक बाबासाहेब अरवत यांनी कळविले आहे.
error: Content is protected !!