August 9, 2025

विशाल धम्मरॅलीचे आयोजन

  • कळंब – दि.२४ ऑक्टोबर २०२३ रोजी आशोक विजयादशमी ६७ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातील क्रांतीभूमी भिमनगर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णक्रती पुतळा विशाल धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
    ही धम्म रॅली भीमनगर,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ,छत्रपती शिवाजी महाराज चौक,अहिल्याबाई होळकर चौक,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या मार्गेवरून जाणार आहे.
    कळंब शहरातील व तालुक्यातील सर्व बौद्ध बांधवांच्या वतीने ऐतिहासिक अशा धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांच्या असीम त्याग प्रभावामुळे आम्हास हा बौद्ध धम्म लाभला,ज्यांच्यामुळे आम्हास हे वैभव प्राप्त झाले ते विश्ववंदनीय बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी हजारोच्या संख्येने या धम्म रॅलीमध्ये सहभागी व्हावे असे बौद्ध बांधवांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.
error: Content is protected !!