August 9, 2025

उद्योजक व शेतकरी बांधवांची बारामती कृषि विज्ञान केंद्राला भेट

  • कळंब – कळंब,धाराशिव तालुक्यातील ग्रामीण भागातील युवकांना अत्याधुनिक व व्यवसायिक शेतीचे नवनवीन प्रयोग पाहता यावे,अनुभवता यावे व प्रेरणा घेऊन प्रत्यक्षात आणता यावे यासाठी माळी विकास मिशनच्या माध्यमातून “आम्हीच पिकवू आम्हीच प्रोसेस करू आणि आम्हीच विकू” या त्रिसूत्रीची अंमलबजावणी करता यावी यासाठी माळी विकास मिशनचे कृषि उद्योग व्यवसाय विंगचे राज्य समन्वयक गोविंद सुमन केशवराव डाके व माळी विकास मिशनचे शिक्षण विंगचे राज्य समन्व्यक संतोषजी भोजने यांच्या पुढाकाराने धाराशिव जिल्ह्यातील तरुण शेतकरी बांधवासाठी एकदिवसीय सहलीचे आयोजन बारामती कृषि विज्ञान केंद्र येथे करण्यात आले.
    यावेळी ढोकी,नायगाव,मुरुड, बोरगाव (बु),मोहा,खामसवाडी आणि नायगाव येथील शेतकऱ्यांना बारामती कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ.विश्वजीत वाबळे यांनी तिथे राबवल्या जात असलेल्या जागतिक दर्जाच्या विविध प्रयोगाबद्दल सविस्तर माहिती दिली.
    आधुनिक शेतीसाठी होत असलेले विविध प्रयोग,मातीविना शेती, शेडनेट,पॉली हाऊस मधील विविध पिकाचे आधुनिक प्रकार,आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या माध्यमातून होत असलेली उच्च उत्पादनाची आधुनिक शेती, त्यातील भाजीपाला पिके, फळाच्या आधुनिक रोपाची माहिती, त्यात कलम केलेली भाजीपाल्याची रोपे हा इंडो डच टेक्नॉलॉजीचा सेन्टर ऑफ एक्सलन्स व्हेजिटेबल च्या प्रोजेक्ट मधूब माहीती मिळाली,
    तसेच उसाच्या विविध आणि भरपूर उत्पादन देणाऱ्या प्रजाती, खते आणि रोग प्रतिबंधक उपचार,बॅक्टेरीअल व ऍग्रो होमिओपॅथी वर नैसर्गिक शेती, विविध प्रकारच्या कलमाच्या भाजीपाला आणि फळाविषयीं माहिती दिली.
    भरड धान्य प्रकल्पातील पिकांच्या लागवडीपासून त्यापासून तयार करण्यात येत असलेल्या विविध बाय प्रॉडक्ट ची प्रात्यक्षिक पाहण्याची संधी मिळाली.तसेच मधुमक्षिका पालन बद्दल ही माहीती मिळाली.
    सेन्टर ऑफ एक्सलन्स डेअरी चे प्रमुख समाननीय डॉ.भोईटे यांनी दीडशे एकरात असलेल्या मुक्त गोठा असलेला- डेअरी फार्म मधील सर्व बाबी तरुण शेतकऱ्यांना दाखवल्या,
    तिथे 400 गायी म्हशींना फक्त 8 माणसे सहजपणे सांभाळतात,दुधाला काढण्यासापासून त्यांवर प्रक्रिया होईपर्यंत मानवी हाताचा स्पर्श होत नाही,इतके हायजेनिक प्रॉडक्शन केले जाते,तिथे शेणापासून बायोगॅस आणि गॅस पासून इलेक्ट्रिसिटी तयार केली जाते,त्या शेणाच्या स्लरीमधले पाणी वेगळे करून त्या पॉवडर मध्ये रॉक फॉस्फेट मिसळून,ऑरगॅनिक डीएपी खत बनवला जातो,हा प्रकल्प तर खरोखरच वाखणण्यासारखा पाहिला, या डेअरी मधून एकही बाब वाया जाऊ दिली जात नाही,डॉ भोईटे अनेक प्रश्नाची दिलखुलास उत्तरे देत गायी म्हशी च्या विविध जाती, दुग्ध उत्पादनतील व्यवसायिकता, आव्हाने, अडचणी उपाय आणि यातल्या संधी बद्दल भरभरून मार्गदर्शन केले.
    कृषि विज्ञान केंद्राचे चेअरमन तथा कृषिभूषण राजेंद्र पवार यांनी तरुणांना सद्यस्थीतीत समाजापुढील विविध समस्या, शेतीतील आव्हाने शेतकरी आत्महत्या, आपल्यातील उणीव आणि काय करू शकतो याची जाणीव करून देतानाच शेतकऱ्यांना शेती अभ्यासासाठी कृषि विद्यापीठे ,संस्था प्रगत शेतकरी यांना भेटण्याची आवश्यकता समजवली.
    हा अभ्यासदौरा यशस्वी करण्यासाठी माळी विकास मिशनचे जिल्हा समन्व्यक संतोष भोजने,एकता परिषदेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब माळी, मनोज माळी,तानाजी माळी अशोक राऊत आणि व्हर्च्युएस ग्लोबल चे सचिन भरणे यांनी परिश्रम घेतले.
error: Content is protected !!